Congress  Anganwadi workers

Congress  Anganwadi workers

Dainik Gomantak 

सत्तेत आल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू: गोवा काँग्रेसचे आश्वासन

2022 मध्ये राज्यात सत्तेत आल्यास अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
Published on

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. 2022 मध्ये राज्यात सत्तेत आल्यास अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

<div class="paragraphs"><p><strong>Congress</strong>&nbsp;&nbsp;Anganwadi workers</p></div>
कला अकादमीचे काम कधी पूर्ण होणार?

पगारवाढ व स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्यात यावी, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

"अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) आपल्या मंगण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करत आहेत. आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवू," असे काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी शनिवारी सांगितले. ते पुढे म्हणाले, "त्या लहान मुलांची (Children) काळजी घेतात, त्यामुळे त्यांना चांगला पगार मिळावा असे आम्हाला वाटते. शिक्षकांना योग्य पगार दिला जातो, मग अंगणवाडी सेविकांना वेगळी वागणूक का?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com