'पुदुच्चेरीत चालतं मग गोव्यात का नाही', दुहेरी नागरिकत्वावरुन माजी खासदार लुईझिन फालेरो आक्रमक

दुहेरी नागरिकत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहले आहे.
Luizinho Faleiro
Luizinho FaleiroDainik Gomantak

Goa Dual Citizenship: गोव्यात मागील काही दिवसांपासून दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा गाजत आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी या मुद्याचे समर्थन केल्यानंतर आता माजी राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी 'पुदुच्चेरीत चालतं असले तर मग गोव्यात का नाही', असे म्हणत दुहेरी नागरिकत्वाचे समर्थन केले आहे.

दुहेरी नागरिकत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहले आहे. 'पुदुच्चेरीत दुहेरी नागरिकत्व चालतं असले तर मग गोव्यात का नाही? गोव्यात गोमन्तकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांच्याशी या मुद्यावर चर्चा करावी अशी विनंती मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे, असे फालेरो म्हणाले.

तसेच, सध्यातरी लोकसभा निवडणूक लढण्याचा माझा विचार नाही, मी कोणत्याही पक्षात नाही. माझ्याकडे असणाऱ्या सर्व पदांचा मी राजीनामा दिला असून, सध्या घरात बसून पुस्तके लिहण्याचा माझा विचार आहे, असेही माजी खासदार लुईझिन फालेरे म्हणाले.

चर्चिल आलेमाव यांनी गोव्यातील अनेकजण पोर्तुगालमध्ये कामानिमित्त असल्याने दुहेरी नागरिकत्व गरजेचे असल्याचे मत यापूर्वा व्यक्त केले होते. पोर्तुगीजांचे कौतुक करताना त्यांनी गोव्यात अनेक विकासाच्या दृष्टीने कामे केल्याचे आलेमाव यांनी नमूद केले होते.

तर, दुसरीकडे मिकी पाशेको यांनी नव्याने मंत्री झालेल्या आलेक्स सिक्वेरा यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. सिक्वेरा यांचा पासपोर्ट पोर्तुगीज असून, त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी माजी आमदार मिकी पाशेको यांनी लावून धरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com