Goa BJP : पार्सेकर आल्यास पक्षाची ताकद आणखी वाढेल!

दयानंद सोपटे : त्यांच्या स्वागतास मी तयार
पार्सेकर-सोपटे
पार्सेकर-सोपटेDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Goa : माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासोबत अजूनही काही जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पार्सेकर जर पक्षात आले, तर मांद्रे मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढेल.

ते जर पक्षात येत असतील तर त्यांच्या स्वागतास मी तयार आहे. मात्र, हा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठीच घेऊ शकतात, असे विधान मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान राज्य सचिव दयानंद सोपटे यांनी केले.

पार्सेकर-सोपटे
Goa Tourism: गोवा सरकारचा मोठा प्लॅन, केंद्राच्या आर्थिक पाठबळाशिवाय साकारणार महत्वाचा प्रकल्प

ते पक्षाच्या कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी सोपटे म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाच्या अखत्यारीतील आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, तसेच राज्यातील प्रमुखांना हा निर्णय घ्यावा लागेल.

जर पक्ष नेतृत्वाला त्यांना पक्षात घ्यावे असे वाटत असेल, तर जे पक्षात येतात त्यांचे स्वागत करणे स्वाभावीक आहे. गोव्यातील बुथ सशक्तीकरण अभियानाच्या गोवा प्रमुखपदी माझी नेमणूक केली असून मी त्याला न्याय देईन.

मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 75 टक्के बुथवर लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मते मिळवायची आहेत. त्याची सुरुवात आजपासून करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पार्सेकर-सोपटे
Goa Carnival 2023: हरमलमध्ये विदेशींच्या कार्निव्हलचा प्रयत्न रोखला

विधानसभा निवडणूक हरल्यानंतर तिसऱ्या दिवसापासूनच मी सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली. शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात नजर लागावी, अशी भरीव कामगिरी झाली आहे.

दि गोवा कपिला मल्टीपर्पज सोसायटीच्या कार्यालयाचे काम आता हाती घेतले आहे. शेती-बागायतींचे काम सुरूच आहे. मी माझ्या आयुष्यात सध्या व्यस्त आहे. भाजप घडविण्यात माझा मोलाचा वाटा आहे. इतर पक्षांकडून ऑफर असतानाही मी भाजप सोडून मी गेलो नाही.

परंतु त्यावेळी अपेक्षाभंग केल्याने मी पक्षापासून वेगळा झालो. जर तसा प्रस्ताव आल्यास विचार करू, अशी प्रतिक्रिया लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com