कळंगुटच्या 'त्या' लेनमध्ये गेलो अन् मला वाटलं थायलंडमध्ये आलोय; गोव्याची भोगवादी प्रतिमा - ब्रह्मेशानंद स्वामी

Sadguru Brahmeshanand Acharya, Goa: गोव्याची भोगवाद अशी ओळख झाल्याचे ब्रह्मेशानंद स्वामी यांचे वक्तव्य
Sadguru Brahmeshanand Acharya Goa
Sadguru Brahmeshanand Acharya Goa

Sadguru Brahmeshanand Acharya, Goa

गोव्याची पर्यटन विश्वात भोगवादी प्रतिमा निर्माण झाली असून, गोव्याची ही खरी ओळख नाही, असे सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी म्हणाले. डिचोली येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वामी बोलत होते.

यावेळी खासदार श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी यावेळी कळंगुटमधील एक अनुभव सर्वांसमोर कथन केला.

'मी चुकून कळंगुटला गेलो, कार्यक्रमाला जागा निश्चित करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. कळंगुटमधील एका लेनमध्ये मी गेलो आणि मला वाटलं मी थायलंडमध्ये आलो आहे. तेथील भयंकर स्थिती पाहून माझं डोकं सुन्न आणि काळीज धस्स झालं, वाटलं हे काय गोव्याचे खरे चित्र नाही,' असे ब्रह्मेशानंद स्वामी म्हणाले. काँग्रेसने याबाबत एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे.

गोव्याची भोगवादी प्रतिमा झालीय. राज्यात अमली पदार्थाची तस्करी सुरु असल्याचे देखील चित्र असून, राज्याची ही खरी ओळख नाही. हे चित्र बदायलायला हवं, असे स्वामी म्हणाले.

Sadguru Brahmeshanand Acharya Goa
Airfare Of FLy91: गोवा, सिंधुदुर्गातून फ्लाय91 ने हैद्राबाद, बेंगळुरुला जाण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील?

ब्रह्मेशानंद स्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे राजे होते. गोव्यासाठी देखील त्यांनी काम केले असून, त्यांचे सर्वत्र पुतळे हवेत असे वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट, बेजबाबदार आणि असंवेदनशील डबल इंजिन भाजप सरकारने गोव्याचे भोग भूमीत रूपांतर केल्याचे म्हटले आहे. याबाबत पक्षाच्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com