Netravalim Forest: नेत्रावळी जंगलात शेकडो टन काकड्यांचा ‘खच’

Netravalim Forest: नेत्रावळी जंगलातील प्रकार: चव घसरल्याने ‘फलोत्पादन’कडून विल्हेवाट
Netravalim Forest:
Netravalim Forest:Dainik Gomantak
Published on
Updated on

Netravalim Forest: गोवा फलोत्पादन महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या काकड्यांची चव घसरल्याने निकृष्ट ठरविल्या जात असल्यामुळे खरेदी केलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेकडो टन काकड्या जंगलातील बंद खाणीत टाकून देण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. परिणामी नेत्रावळीतील जंगलात काकड्यांचा खच पाहायला मिळत आहे.

Netravalim Forest:
Karmal Ghat Traffic Jam: करमल घाटात कंटेनर पलटी; वाहतूक इतर मार्गाने वळवली

सविस्तर माहिती नुसार नेत्रावळी येथील गोवा हॉर्टिकल्चर (फलोत्पादन)महामंडळाचे मोठया प्रमाणात गावठी भाजी, फळांच्या खरेदीचे केंद्र आहे. त्यात नेत्रावळी आणि लगतच्या परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात आपला तयार माल महामंडळाला विक्री करण्यासाठी घेऊन येत असतात. त्यात तयार भाजीपाला, फळे आणि मोठ्या प्रमाणात काकडीचा समावेश असतो. अन्य भाजी आणि फळांना निकृष्ट माल म्हणून वेगळे केले जात नसले, तरी काकडीची तातडीने विक्री न झाल्यास काकडीची चव घसरते .

परिणामी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या काकडीची विक्री होत नसल्याने तो माल निकृष्ट दर्जाचा ठरू लागला. दरदिवशी नवीन काकडी तयार होत असल्यामुळे जुनी काकडी फेकून देण्याखेरीज पर्याय राहिलेला नसतो. महामंडळाच्या निर्धारित साच्यानुसार काकडी नसल्यास ती निकृष्ट दर्जाची मानली जाते. चांगली काकडी राज्यभरातील महामंडळाच्या विक्री केंद्रातून विकली जात असते.एका बाजूने मोठया प्रमाणात काकडी विकण्यासाठी शेतकरी घेऊन येतात. तर दुसऱ्या बाजूने खरेदी केलेल्या काकड्या विकल्या न गेल्याने त्या साठवून ठेवणे कठीण बनते. शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून ‘फलोत्पादन’कडून बंद खाणीत काकड्यांची विल्हेवाट लावली जात आहे.

सरकारने बाजारपेठ मिळवून द्यावी !

एका काजूर गावात शंभरहून अधिक शेतकरी काकडीचे उत्पादन घेतात. २८ रु. किलोप्रमाणे खरेदी केली जाते. सरकार उत्पादन रोखू शकत नसले तरी नवी बाजारपेठ शोधणे हेही सरकारचे काम आहे. अन्य राज्यात बाजारपेठ उपलब्ध केल्यास शेतकरी व महामंडळ नफ्यात येऊ शकते, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

Netravalim Forest:
OBC Federation Of Goa: शिल्लक मागण्या पूर्ण करा - मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंपोस्ट खतासाठी वापर व्हावा

काकड्या फेकून देण्यापेक्षा सरकारने कंपोस्ट खतासाठी कालेतील सरकारी फार्म मध्ये नवीन पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. बंद खाणीत कंपोस्ट खत होणार नसून काले सरकारी फार्म मध्ये मोठया प्रमाणात पडीक जमीन आहे. तिथे कंपोस्ट खताचा पर्याय तयार करावा.याबाबत सरकारने विचार करावा,अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com