Arlem House Fire : आर्ले येथे घराला आग; दोघे जखमी; ४० हजारांचे नुकसान

Arlem House Fire : ही आग सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान लागली. माहिती मिळाल्यानंतर मडगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन ही आग विझविली.
Arlem House Fire
Arlem House FireDainik Gomantak

Arlem House Fire :

फातोर्डा, आर्ले येथील पेप्सी फॅक्टरीजवळ एका घरातील स्वयंपाकघराला आग लागून ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच घरातील सदस्य असलेल्या वेलान्टिनो गावकर यांच्या हाताला इजा झाल्याने त्यांना मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तर अन्य एका सदस्याला श्‍वास कोंडल्यामुळे त्रास झाला. अग्निशमन दलाच्या पथकाला १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.

Arlem House Fire
Goa Loksabha Election: इंडिया आघाडी आरजीच्या तीन अटी मान्य करणार? परब, परेरा यांचे अर्ज दाखल

ही आग सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान लागली. माहिती मिळाल्यानंतर मडगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन ही आग विझविली. या आगीत वॉशिंग मशीन व काही फर्निचर जाळून गेले आणि ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागलेले हे घर आर्तिम गावकर यांच्या मालकीचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com