Goa: पंतप्रधान रोजगार निर्मितीवर आज वेबिनारचे आयोजन

वेबिनार यूट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित केले जाईल.
CM Pamod Sawant
CM Pamod SawantDainik Gomantak

पणजी: गोव्यातील (Goa) तरुणांमध्ये उद्योजकता वाढवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pamod Sawant) आज 27 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायं. 6 वा. पंतप्रधान रोजगार निर्मिती (PM job creation) कार्यक्रमाच्या जागरूकतेवर वेबिनारमध्ये संबोधित करणार आहेत.

CM Pamod Sawant
Goa: फोंड्याची काँग्रेसची उमेदवारी कोणाला?

वेबिनार यूट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित केले जाईल. यूट्यूब @डॉ प्रमोद सावंत अणि फेसबुक - @सीएमओ गोवावर वेबिनार असेल. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एमएसएमई मंत्रालयाची एक प्रमुख योजना आहे. प्रकल्पाला पात्रतेनुसार 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय डीआयडीसी, खादी आणि ग्रामोध्योग मंडळ, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे या योजनेची गोव्यात अंमलबजावणी करीत आहे.

CM Pamod Sawant
राष्ट्रपतींचा दौरा: 5 सप्टेंबरपासून तीन दिवस गोव्यात; डागडुजीचे काम युध्दपातळीवर

या एजन्सीचे प्रतिनिधी लोकांना पात्रता, लाभ आणि अर्ज करण्याची पद्धत अशा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी मार्गदर्शन करतील. एसबीआयच्या प्रतिनिधीद्वारे प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. उत्पादन किंवा सेवा उपक्रम सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हे वेबिनार लाभदायक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com