Chilli News : संकरीत मिरचीची लागवड करणार : चंद्रहास देसाई

फलोत्पादन महामंडळाचा उदयपूर-जयपूर अभ्यास दौरा
Horticulture Corporation Manager Chandrahas Desai
Horticulture Corporation Manager Chandrahas DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Chilli News : पणजी, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी विद्यापीठाने अनेक प्रकारच्या मिरचीची निर्मिती केली आहे. त्यापैकी दोन-तीन प्रकारच्या मिरचीचे उत्पादन आम्ही गोव्यात घेऊ शकतो.

फलोत्पादन महामंडळाचे स्वतःच्या (फार्ममध्ये) बागायतीत या मिरचीचे उत्पादन घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

यासोबतच काकडी, चिटकी संबंधी झालेले संशोधन, विविध उत्पादनांबाबत माहिती घेतली, असे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांच्यासह महामंडळाच्या शिष्टमंडळाने उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी विद्यापीठच्या शिक्षण संचालनालयाच्या कृषिसंग्रहालयाची पाहणी केली.

Horticulture Corporation Manager Chandrahas Desai
Panaji News : ‘भारतीय आयुर्वेद संस्थे’चा ‘आयुरक्षा’पॅक ठरतोय वरदान

तेथील कृषीसंबंधी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

उदयपूरमधील मंडीला (भाजी मार्केटला) आम्ही भेट दिली. ते माल कसे आणतात, त्याची होणारी विक्री, या पद्धतींचा वापर गोव्याच्या अनुषंगाने कसा करता येईल याबाबत आम्ही माहिती करून घेतली. गोव्याच्या अनुषंगाने यातील काही बाबींचा विचार करणे शक्य आहे.

राज्याच्या कृषी आणि फलोत्पादन महामंडळाच्या उत्कर्षाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल. फलोत्पादन महामंडळाचा हा अभ्यास दौरा होता.

- चंद्रहास देसाई, व्यवस्थापक, फलोत्पादन महामंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com