Honeytrap Case: हनी ट्रॅप का टेरर फंडिंग, गोव्यातील 'ती मॅडम' आहे कोण? गोरखपूरचा युवक ATS च्या रडारवर

Honeytrap Case: आर्थिक तंगीमुळे तो तरुण गोव्यात पैसे कमवण्यासाठी गेला होता, असे सांगितले जात आहे.
Honeytrap Case
Honeytrap CaseDainik Gomantak

Honeytrap Case

पिप्राइच, गोरखपूर येथून टेरर फंडिंगच्या संशयावरुन दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. गोव्यातील एका मॅडमच्या आदेशावरुन तो ऑनलाइन व्यवहार करत होता अशीही माहिती समोर आलीय.

तरुण टेरर फंडिंग का हनी ट्रॅपमध्ये गुंतलाय याची चौकशी सध्या एटीएस करत असून, गोव्यातील ती मॅडम नक्की आहे तरी कोण? याचाही शोध घेतला जात आहे.

एटीएस पथकाने गुरुवारी (दि.१६) पिप्राइचमधील एका गावातून तरुणाला ताब्यात घेतले होते. तरुणाची चार तास चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एटीएस पथक त्याला लखनौला घेऊन गेले. अद्याप तपास सुरू असून प्रकरणाच्या खोलात गेल्यावरच ठोस काही सांगता येईल, असे एटीएस अधिकाऱ्यांचे म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून टेरर फंडिंग होत असल्याच्या माहिती शुक्रवारी (दि.१७) प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुप्तचर विभागाचे पथक तरुणाच्या घरी दाखल झाले आणि त्याच्या आईची चौकशी केली.

ताब्यात घेण्यात आलेला तरुण एका आशा कार्यकर्तेचा मुलगा आहे. 20 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. उदरनिर्वाहासाठी तो गोव्यात आला होता आणि जहाजावर काम करत होता.

Honeytrap Case
Fishing Ban In Goa: गोव्यात एक जूनपासून 61 दिवस मासेमारीला बंदी

चौपदरीकरणासाठी गावाकडील जमीन संपादित करण्यात आली तेव्हा, तो मोबदला घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच गावी परतला होता. भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर त्यांना सध्या घर बांधून देण्यात येत होते.

तरुणाच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याची ठोस माहिती यूपी एटीएसकडे आहे. याचा संबंध टेरर फंडिंगशी असू शकतो असे एटीएसचा दावा आहे.

प्राथमिक चौकशीत गोव्यातील काही 'मॅडमजी'ने त्यांच्याकडून हा व्यवहार केल्याचे एटीएसला समोर आले आहे. आता या ‘मॅडम जी’ कोण आहेत आणि तिने त्या तरुणाला कसे अडकवले? ‘मॅडम जी’ चा हेतू काय आहे आणि त्या तरुणाची भूमिका काय आहे? हा व्यवहार का झाला आणि त्याचे लिंक आयएसआयशी जोडलेले आहेत की नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात एटीएस व्यस्त आहे.

हनी ट्रॅपसारख्या कोनातूनही या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे एटीएसने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com