होंडा औद्योगिक वसाहतीमुळे रोजगाराबरोबर बागायतदारांना चांगले दिवस

भारत सरकारच्या (Government of India) अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने गोवा (Goa)बागायतदार संस्थेचा पुढाकार
होंडा औद्योगिक वसाहतीत उभ्या राहिलेल्या अन्न प्रक्रिया केंद्राचा सुसज्ज प्रकल्प
होंडा औद्योगिक वसाहतीत उभ्या राहिलेल्या अन्न प्रक्रिया केंद्राचा सुसज्ज प्रकल्प Dainik Gomantak

पिसुर्ले: होंडा औद्योगिक वसाहतीत (Industrial colony) प्लॉट क्रमांक 28 मध्ये गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने प्रधानमंत्री (Prime Minister) किसान संपदा योजने अंतर्गत आणि भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील पहील्या कृषी प्रक्रिया केंद्रांचे उद्घाटन बुधवार दि 27 रोजी संध्याकाळी चार वाजता राज्याचे मुख्यमंत्री(CM) डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी वाळपई मतदार संघाचे आमदार (MLA) तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सहकार मंत्री गोविंद गावडे, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो, पर्ये मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व होंडा ग्रामपंचायत सरपंच आत्मा गावकर यांची खास उपस्थिती असणार आहे.

होंडा औद्योगिक वसाहतीत उभ्या राहिलेल्या अन्न प्रक्रिया केंद्राचा सुसज्ज प्रकल्प
जमिनीच्या उतार्‍यावरून IIT चे नाव अद्याप हटवले नाही; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा ईशारा

होंडा औद्योगिक वसाहतीत सदर स्वरूपाचा हा पहिला प्रकल्प असून, पुर्ण पणे शेतकी उत्पादनांवर आधारित असलेल्या या प्रकल्पात कुशल तसेच अकुशल कामगारांना रोजगाराच्या (Employment) संधी उपलब्ध होतानाच बागायतदारांना सुद्धा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात सदर प्रकल्पाचे (Project) स्वागत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com