Honda : ‘विधवा प्रथा बंद’चा ठराव मंजूर

होंड्यात घरपट्टीत वाढ : कचरा संकलनासाठी ३०० रुपये कर
Honda Panchayat
Honda PanchayatGomantak Digital Team
Published on
Updated on

पिसुर्ले : होंडा पंचायतीच्या ग्रामसभेत विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी ‘विधवा प्रथा बंद’ करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.

तसेच पंचायत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करून वाढीव घर पट्टी आकारणे, कचरा निर्मूलन मोहिमेला पाठिंबा देताना वार्षिक ३०० रुपये कर वसूल करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी ग्रामसभा सरपंच शिवदास माडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच रेशम गावकर, पंच स्मिता मोटे, नीलिमा शेट्ये, सुशांत राणे, दीपक गावकर, प्रमोद गावडे, नीलेश सातार्डेकर, कृष्णा गावकर, सिया बोडके, पंचायत सचिव मुला वरक त्याच प्रमाणे गटविकास कार्यालयातून निरीक्षक म्हणून गौरेश राणे उपस्थित होते.

सरपंच माडकर यांनी स्वागत केले. सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करताना नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी गटारांची साफ सफाई करावी, अशी मागणी केली. त्याप्रमाणे पंचायत क्षेत्रातील ‘इ वेस्ट’ गोळा करण्याची मागणी केली.

होंडा पंचायत क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करून वाढीव घरपट्टी आकारण्यात येणार असल्याची माहिती पंचायत सचिव मुला वरक यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नसून रहिवासी घर तसेच व्यावसायिक आस्थापने यावर कायद्याच्या चौकटीत राहून कर आकारला जाणार आहे.

हिवासी तसेच व्यावसायिक आस्थापने यांच्याकडून कचरा व्यवस्थापनासाठी महिन्याला २५ रुपये कर म्हणजे वर्षाला ३०० रुपये द्यावे लागणार आहेत.

Honda Panchayat
Skin Care Tips: तुम्हीही चेहऱ्यावर साबण लावता? मग हे वाचाच; होऊ शकतात या 4 समस्या

राज्यातील ‘विधवा प्रथा बंद’ करण्यासाठीचा ठराव या भागातील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी कुलकर्णी यांनी सादर केला, या ठरावाला प्रिया नाटेकर यांनी अनुमोदन दिले आणि ठराव मंजूर करण्यात आला.

प्रिया नाटेकर यांनी नाल्यात मातीचा भराव टाकून नाला प्रदूषित करण्यात येत असल्याचे सांगितले व या संबंधी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. उपसरपंच रेशम गावकर हिने आभार व्यक्त केले.

Honda Panchayat
RBI Repo Rate Hike: कर्जाचा हफ्ता आणखी वाढणार? आरबीआयकडून सलग सातव्यांदा रेपो दरात वाढ शक्य

कचरा टाकणाऱ्यावर कारवाई !

पंचायत क्षेत्रातील चिकन सेंटर, केस कर्तनालयाकडून उघड्यावर मांस, केस टाकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते. शिवाय इतरही अनेक समस्या निर्माण होतात. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होईल. निश्‍चितपणे त्यांना दंड भरावा लागेल.उघड्यावर कचरा टाकण्याऱ्याची गय केली जाणार नाही, असेही सचिव वरक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com