Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?
Shefali VaidyaDainik Gomantak

Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?

Goa Tourism Stats Row: सरकारने या टॅक्सी माफियांवर कडक कारवाई केली पाहिजे. पण माझ्या गृहराज्यात समुद्रकिनारी पर्यटन आणि क्लबिंगशिवाय बरचं काही आहे, असे त्यांनी नमूद केले.
Published on

गोव्यात सध्या पर्यटन सुरु हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत आहेत. पण दुसरीकडे, गोव्यात सध्या वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. कोरोना काळानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचं सीईआयसीच्या अहवालात सांगण्यात आलं. यानंतर या अहवालावरुन चर्चेला सुरुवात झाली. या अहवालावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी गोव्यातील टॅक्सी माफिया आणि महागड्या हॉटेल्सना दोषी धरले.

याच पार्श्वभूमीवर आता, गोव्यातील इतिहासाच्या अभ्यासिका शेफाली वैद्य यांनी या वादावर परखड भाष्य केले आहे. टॅक्सी माफिया आणि ज्यादा शुल्क आकारणारी हॉटेल्स हे गोव्यात मुद्दे आहेत. सरकारने या टॅक्सी माफियांवर केली पाहिजे. पण माझ्या गृहराज्यात समुद्रीपर्यटन आणि क्लबिंगशिवाय बरचं काही आहे, असे त्यांनी नमूद केले.

Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?
Goa Tourism Row: आकडेवारीचा वाद टोकाला; पोस्ट करणाऱ्या CEO विरोधात सावंत सरकारची पोलिसांकडे तक्रार

दरम्यान, गोव्याचे समुद्रकिनारे गलिच्छ आणि पर्यटकांनी भरलेले असल्याचा दावा करणाऱ्या लोकांना मला विचारायचे आहे की, समुद्रकिनारे कोण घाण करतात? स्थानिक लोक समुद्रकिनारे नक्कीच घाण करत नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वैद्य पुढे म्हणाल्या की, ''मी पर्यटकांना त्यांच्या मुलांचे डायपर समुद्रकिनाऱ्यावर सोडताना अनेकदा पाहिलं आहे. जेव्हा मी मुलांच्या आईंना डायपर घेऊन जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी मलाच सवाल केला की ‘समुद्रकिनारा तुमची खाजगी मालमत्ता आहे का?'

Shefali Vaidya: 'खरा गोवा' समजावून सांगतानाच शेफाली वैद्य यांची भाजप सरकारला कळकळीची विनंती; वाचा नेमकं काय म्हणाल्या?
Goa Tourism Stats Row: गोवा सरकारच्या तक्रारीनंतर रामानुजन मुखर्जी यांची संतप्त प्रतिक्रिया; "हा तर..."

वैद्य शेवटी म्हणाल्या की, ''गोव्यात येणारे सर्वच पर्यटक स्वस्त दारु आणि पार्टीसाठी येतात असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला रियल गोवा एक्सप्लोर करायचा असेल तर इथली मंदिरे पाहिली पाहिजेत. गोव्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. गोव्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य अनुभवलं पाहिजे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com