नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार

Narendra Dabholkar Case: 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती.
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार
Vikram Bhave felicitated By Hindu Janjagruti Samiti Dainik Gomantak

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातून निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार करण्यात आला. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सनातनचे विक्रम भावे आणि न्यायालयीन खटला लढवणारे प्रकाश साळसिंगीकर यांचा सत्कार करण्यात आला.

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी लागलेल्या निकालात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आले.

तर, विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवण्यात आले.

गोव्यात आयोजित वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी समितीने सनातनचे साधक विक्रम भावे, न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अधिवक्ता मृणाल व्यवहारे आणि अधिवक्ता स्मिता देसाई यांचा भाजप टी. राजासिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील निर्दोष सुटलेल्या आणि खटला लढणाऱ्या वकिलाचा हिंदू जनजागृती समितीकडून गोव्यात सत्कार
Goa Murder Case: दारुच्या बाटलीसाठी मित्राचा खून, संशयिताला अटक

अकरा वर्षापूर्वी 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणाचा 10 मे 2024 निकाल लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवत जन्मठेप आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com