अभिनेता रणदीप हुडाने दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.
राज्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय पाठ्यपुस्तकांमधून दुर्दैवाने आपल्या क्रांतीकारकांविषयी जुजबी, तर कधी चुकीची माहिती दिली जाते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांविषयी सविस्तर आणि खरी माहिती मिळाल्यास त्यांना त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होऊन विद्यार्थ्यांमधील देशप्रेम वृद्धींगत होण्यास अधिक साहाय्य होईल, असे समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये त्यांची जीवनकथा उलगडली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वा. सावरकर यांनी अंदमानमधील काळ्या पाण्याची शिक्षेची भयावहता अधिक सखोलपणे मांडण्यात आल्याचे निवेदनात म्हटलंय.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यास त्यांच्याविषयी पसरवला जात असलेला अपसमज सहजपणे दूर होऊ शकतो. पुढची पिढी राष्ट्रप्रेमी घडायला हवी, यासाठी अधिकाधिक युवकांनी हा चित्रपट पहायला हवा. म्हणून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.