ज्यांनी आधी मला सुनावलं त्यांनीच नंतर गोव्यात व्हिला खरेदी केले! अभिनेत्री मेघनाने सांगितला गोव्यात घर घेण्याचा 'तो' किस्सा

राज्य देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं तेव्हा बॉलीवूडमधील अनेकांनी इथे मालमत्ता विकत घेण्यास सुरुवात केली.
Actress Meghana Naidu House in Goa
Actress Meghana Naidu House in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Actress Meghana Naidu House in Goa: जेव्हापासून गोव्याची भौगोलिक प्रगती होऊ लागली त्यानंतर आपोआपच अनेकांची पावले गोव्याकडे वळू लागली. जेव्हा आपलं राज्य देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं तेव्हा बॉलीवूडमधील अनेकांनी इथे मालमत्ता विकत घेण्यास सुरुवात केली. याबद्दल हिंदी अभिनेत्री मेघना नायडूने एक जुना किस्सा सांगितला आहे.

Actress Meghana Naidu House in Goa
'या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी मरण्याची गरज नाही'; पाऊस आणि कोकण, माजी मंत्री सुरेश प्रभुंचे ट्विट व्हायरल

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री मेघना नायडू जेव्हा गोव्यात आली तेव्हा इथे ठरावीक सेलेब्रिटींचीच घरे होती. मात्र त्यावेळी इंडस्ट्रीमधील लोकांचे असे मत होते की इथे घर विकत घेणे ही काय योग्य निवड नाही.

याबाबत मेघना म्हणते, त्यावेळी मला वाटतं इथे फक्त श्वेता साळवे आणि पिया त्रिवेदी यांचीच घरं होती. इंडस्ट्रीतील लोकांनी मला इथे घर घेऊन पैसे गुंतवल्याबद्दल अनेकदा सुनावले. मी गोव्यात घर घेऊन पैसे वाया घालवले असे त्यांचे मत होते.

पण गोवा नेहमीच माझ्या हृदयाजवळचे ठिकाण आहे. माझ्यासाठी हे ठिकाण नेहमीच एक आल्हाददायक भावना राहिली आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याची मला पर्वा नव्हती. कांदोळीमध्ये माझे घर खरेदी करताना मला खूप आनंद झाला. कोविडच्या काळात ज्यांनी मला त्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्वांनी आपली मुंबईतील घरे विकून इथे घर/व्हिला विकत घेतले होते. तेव्हा मी म्हटलं, 'अब बात करो'.

माझे इथले घर 1BHK आहे, पण ते अतिशय आरामदायी आहे. त्यामुळे मला वाटते आम्ही कदाचित लवकरच गोव्याला येऊ

गोवा म्हणजे आल्हाददायक भावना आहे; मेघना

मेघना म्हणते की तिला गोव्याबद्दल सर्व काही आवडते आणि तिच्या लहानपणापासून गोवा तिच्यासाठी एक सुंदर भावना आहे. त्यामुळे ती म्हणते -

...आनंद झाला की गोव्याला जा

…दु:खी असताना गोव्याला जा

…जेव्हा तुम्हाला काहीतरी सेलिब्रेट करायचं असेल तेव्हा गोव्याला जा

…जेव्हा तुम्हाला सेलिब्रेट करायचं नसेल, तेव्हाही गोव्याला जा

आता जर पाहिलं तर बॉलीवूडमधील अनेक लोकांनी हॉलिडे होम म्हणून गोव्यात गुंतवणूक केलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com