Hina Khan Honeymoon: अभिनेत्री हिना खान आणि रॉकीचा रोमँटिक अंदाज, हनीमूनसाठी गोव्यात; PHOTO केले शेअर

Hina Khan Goa Vacation: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा दीर्घकाळचा मित्र रॉकी जयस्वालसोबत लग्न केलं.
Hina Khan Rocky Jaiswal Goa Honeymoon
Hina Khan Rocky Jaiswal Goa HoneymoonDainik Gomantak
Published on
Updated on

Hina Khan Rocky Jaiswal Goa Honeymoon

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा दीर्घकाळचा मित्र रॉकी जयस्वालसोबत लग्न केलं. विवाहानंतर तिने कोणताही ब्रेक न घेता तत्काळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळं तिला हनिमूनसाठी वेळ मिळू शकला नव्हता. मात्र, आता हिनाने तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत नवऱ्यासोबत गोव्यात हनिमून एन्जॉय करत आहे.

हिना आणि रॉकी सध्या गोव्यात एकत्र वेळ घालवत आहेत. लग्नाच्या सुमारे १५ दिवसांनी ते दोघं हनिमूनला गेले असून, हिनाने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत गोव्यातील क्षणांचे काही फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये हिना आणि रॉकी एकत्र ड्रिंकचा आनंद घेताना दिसतात. या क्षणाला खास बनवत हिनाने 'चिअर्स...' असे फोटोला कॅप्शन दिलं आहे. आणखी एका फोटोमध्ये हिना झोपाळ्यावर बसलेली दिसतं आहे. पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट आणि अगदी साधा लूक असतानाही हिना अतिशय सुंदर दिसत आहे.

Hina Khan Rocky Jaiswal Goa Honeymoon
Goa Politics: गावडेंच्या अडचणी वाढल्या! प्रियोळातच आव्‍हान; बेतकी-खांडोळा सरपंचांवर अविश्‍‍वास; इतर ठिकाणी हालचाली सुरू

फोटोमध्ये हिना आणि रॉकी एकत्र ड्रिंकचा आनंद घेताना दिसतात. या क्षणाला खास बनवत हिनाने 'चिअर्स...' असे फोटोला कॅप्शन दिलं आहे. आणखी एका फोटोमध्ये हिना झोपाळ्यावर बसलेली दिसतं आहे. पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट आणि अगदी साधा लूक असतानाही हिना अतिशय सुंदर दिसत आहे.

याआधीही हिनाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये रॉकी तिचे पाय दाबताना आणि तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनाही भावला होता आणि त्यावर बऱ्याच कमेंट्सही आल्या होत्या.

Hina Khan Rocky Jaiswal Goa Honeymoon
Goa BJP: भाजपच्या पक्ष नियुक्त्यांवर 'दामूंचा' वरचष्मा! मूळ मुशीतील नेत्यांना प्राधान्य; प्रियोळ मतदारसंघावर ‘विश्‍वास’

हिना खान आणि रॉकी जयस्वाल यांचं लग्न अगदी खासगी आणि साध्या पद्धतीने नोंदणीकृत स्वरूपात पार पडलं होतं. आता दोघंही वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com