Dabolim: रस्ता बनतोय, झाडांचा नाश होतोय त्याचे काय? बोगमाळो-क्विनीनगर रस्ता रुंदीकरणात रोपांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Dabolim Bogmalo: दाबोळी-बोगमाळो ते क्विनीनगर दरम्यानच्या महामार्गाचे रूंदीकरण तसेच उड्डाण पुलाच्या कामांमुळे रस्ता दुभाजकावरील रोपटी, झाडांवर संकट ओढवले आहे.
Dabolim Bogmalo Road Widening
Dabolim Bogmalo Road WideningDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी-बोगमाळो ते क्विनीनगर दरम्यानच्या महामार्गाचे रूंदीकरण तसेच उड्डाण पुलाच्या कामांमुळे रस्ता दुभाजकावरील रोपटी, झाडांवर संकट ओढवले आहे. ही रोपटी इतरत्र लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. तथापि त्या रोपट्यांवर दगडमाती, टाकाऊ साहित्य टाकण्यात येत आहे.

पाण्याअभावी ती झाडे सुकत चालली आहेत. रोपट्यांनीही माना टाकल्या आहेत. एकीकडे ‘ग्रीन लंग्स’ ची संकल्पना पुढे आहे. तर दुसरीकडे हिरवागार असलेला दुभाजक ओकाबोका करण्यात येत आहे. यासारखे दुर्देव नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गोव्यात झालेल्या ब्रिक्स् बैठक तसेच जी-२० बैठकांच्या काळात या दाबोळी विमानतळ ते वेर्णा चौकापर्यंतच्या दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपयांची शोभेची झाडे, फुलांची रोपटी त्या दुभाजकांत लावली होती. त्यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर या झाडांची व रोपट्यांची योग्य निगा घेण्यात येत होती.

परंतु आता रस्ता रुंदीकरण व उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यावर त्या झाडांना पाणी देणे बंद झाले आहे.त्यांच्यावर दगडमाती टाकण्यात येत आहे. बरीच झाडे व रोपट्यांनी माना टाकल्या आहेत. नागरिकांत एकंदर कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दाबोळी- बोगमाळो ते क्विनीनगर दरम्यानच्या दुभाजकांतील झाडे व रोपटी शांतीनगर ते वरुणापुरी दरम्यानच्या दुभाजकामध्ये लावण्याची गरज होती. तेथील दुभाजकाला शोभा आली असती. परंतु तसे करण्याऐवजी ती कशी वठून जातील याकडे अधिक लक्ष दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Dabolim Bogmalo Road Widening
Bhoma Road: 'ती' 40 घरे पाडली जाणार नाहीत, पण बगलमार्ग बांधणे शक्य नाही; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, भोमवासीय मागण्यांवरती ठाम

कदाचित रस्ता रुंदीकरण व उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर तेथील दुभाजकामध्ये लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे व रोपटी लावण्यात येतील. तथापी सध्या लाखोंच्या झाडांचा व रोपट्यांचा नाश करण्यात येत आहे त्याचे काय ? याचे उत्तर देण्याची गरज आहे. नवी काम करताना जुन्या गोष्टींचा नाश केलाच पाहिजे काय? त्या जुन्या गोष्टींचा कोठे उपयोग होतो काय? हे पाहण्याची बुध्दी त्या संबंधितांना कधी येणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dabolim Bogmalo Road Widening
Bhoma Road: ते '36 प्लॉट' वाचवण्यासाठी चौपदरी रस्ता! संतप्‍त भोमवासियांचे आरोप; सरपंचांना धरले धारेवर

दगडमातीला पाणी घालता काय?

येथील शांतीनगर ते वरुणापुरी दरम्यानचा दुभाजकांमध्ये झाडे व रोपटी लावली होती. सात आठ वर्षे झाली, तथापि सध्या दुभाजक तो ओकाबोका आहे. तरीही त्या दुभाजकामध्ये सकाळ व सायंकाळी टँकरातून पाणी घालण्यात येते. तेथील दगडमातीला पाणी घालण्यात येते, असे नागरिक मिश्किलपणे म्हणताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com