Goa Beach Party : हायप्रोफाइल सेटिंगमुळे किनारी भागात कर्णकर्कश पार्ट्या? अखेर पोलिसांनी दिलं उत्तर

बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या संगीत पार्ट्यांचे भूत हणजूण व वागातोर गावांच्या मानगुटीवरून अजून उतरलेले नाही.
Goa Beach Party :
Goa Beach Party :Dainik Gomantak

Goa Beach Party: बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या संगीत पार्ट्यांचे भूत हणजूण व वागातोर गावांच्या मानगुटीवरून अजून उतरलेले नाही. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांकडे वारंवार तक्रार देऊनही हा कर्णकर्कश आवाज अजून बंद झालेला नाही.

पार्ट्यांच्या आयोजकांकडून हायप्रोफाईल सेटिंग होत असल्यानेच पोलिस व इतर यंत्रणा याकडे डोळेझाक करतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Goa Beach Party :
राज्यहितार्थ प्रत्येक युवकाने ‘शिवाजी’ बनावे : राजू नायक

याविषयी समाजकार्यकर्ते तथा स्थानिक रवी हरमलकर यांनी दोन दिवसांपूर्वीच वागातोर परिसरात रात्री 11 नंतरही मोठ्या आवाजात क्लबच्या आवारात संगीत वाजविले जात असल्याचा एक लहान व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.

याविषयी प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार करूनही किंवा पाठपुरावा करूनही कोणीच धजावत नाही. मुळात आयोजकांचे सेटिंग असल्यानेच हे प्रकार अजून बंद झालेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिस यंत्रणा गप्प का?

वाहनचालकांकडून तालांव गोळा करण्यासाठी पोलिसांची फौज दरवेळी रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. मग, अशाप्रकारे गावातील शांतता भंग करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी यंत्रणा काहीच का करू शकत नाही? दरवेळी लोकांनीच का आवाज उठवावा?

पोलिसांनी स्वतःहून छापेमारी केल्यास किंवा कारवाई सत्र आरंभल्यास या बेकायदा गोष्टीला पूर्णविराम लागू शकतो. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसोबत मिलीभगत असल्याने सर्वजण मूग गिळून गप्प बसतात, असा आरोप स्थानिकांनी केला.

स्थानिक पोलिसांना मी फोन करतो, तेव्हा पोलिसांना पाठविले जाईल, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्राउंडवर कधी पोलिस पोहोचतच नाहीत.

याशिवाय न्यायालयाच्या निर्देशांची प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांकडून पायमल्ली होत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 वा.नंतर संगीत वाजवता येत नाही. मात्र, हणजूण गावात याचे सर्रास उल्लंघन होत आहे.

- रवी हरमलकर, समाजकार्यकर्ते

ध्वनिप्रदूषणाविरोधात काही तक्रार आल्यास आम्ही पोलिस कारवाई करतोच आणि जे कुणी कारवाई करीत नाहीत, असे आरोप करतात ते चुकीचे आहेत.

तक्रार येताच पोलिस घटनास्थळी जातात आणि कुणाला याबाबत संशय असल्यास संबंधितांनी तक्रार किंवा फोन केल्यावर घटनास्थळी थांबून खात्री करून घ्यावी. आम्ही पोलिस नेहमीच सर्व कैफियतांची दखल घेतो.

- प्रशल नाईक देसाई, हणजूण पोलिस निरीक्षक

गावातील शांतता होतेय भंग :

संगीत वाजवण्याकरिता काहीजण रात्री दहापर्यंत परवानगी घेतात. मात्र, मध्यरात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश संगीत चालवतात. या कर्णकर्कश संगीतामुळे गावातील शांत वातावरण पूर्णतः दूषित झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

जवळपास 11 ते 13 क्लब येथे कार्यरत असून ते रात्री दहानंतर वागातोर परिसरात बिनदिक्कतपणे मोठ्या आवाजात संगीत वाजवतात, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com