Margao Fish Market: उच्च न्यायालयाने मडगावमधील घाऊक मासळी बाजाराच्या खराब आणि अस्वच्छ स्थितीची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाला या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी आखलेल्या कृती आराखड्याचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काल सोमवारी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसजीपीडीएच्या घाऊक आणि किरकोळ मासळी बाजाराबाबत तपासणी अहवाल दाखल केला.
“या अहवालातील निरीक्षणे खूपच अस्वस्थ करणारी आहेत. बाजार चालवणारे SGPDA किंवा मडगाव परीषद दोन्हीपैकी एकानेही अनधिकृत कचरा किंवा नाले आणि शेतात सांडपाणी सोडण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलती नाहीत,” असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस सोनक आणि भारत देशपांडे यांनी नोंदवले आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात असे सूचित होते की तपासणीच्या वेळी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र देखील कार्यान्वित नव्हते. तसेच ते ऑपरेट करण्याची संमती देखील कालबाह्य झाली आहे.
खंडपीठाने बाजार चालवणाऱ्या SGPDA ला आवश्यक माहिती आणि कृती आराखड्यासह न्यायालयात हजर राहण्यास सांगितले असून प्रकरणाची सुनावणी 13 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.