गोवा गुन्हेगारी मुक्त करण्यास सहकार्य करा : पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना

हरमलात नायजेरियन युवती वेश्या व्यवसायात असून किनारी भागात त्यांचा व्यवसाय चालतो, पोलिस नेमके काय करतात, असा सवाल संजय मयेकर यांनी केला.
Shobit Saxena
Shobit SaxenaDainik Gomantak

हरमल : गोवा भूमीचे आकर्षण देशी व विदेशी नागरिकांना असण्याची अनेक कारणे आहेत. त्यासाठी गोवा गुन्हेगारीमुक्त व भयमुक्त करण्यास व्यावसायिक व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी केले. (Help us make Goa crime free, says Shobit Saxena auk96)

Shobit Saxena
केंद्राच्या साहाय्याने राज्यात ‘क्रूझ टर्मिनल’ला प्रोत्साहन

पेडणे तालुक्यातील किनारी पट्ट्यातील सरपंच, पंच, व्यावसायिक व नागरिकांच्या सुसंवाद बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नागरिक दिगंबर कोरकणकर, शशिकांत हरिजन, संजय मयेकर, शेट्टी, मंटेक सिंग आदींनी सूचना व समस्या मांडल्या.यावेळी पेडणे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक, उपअधीक्षक सुदेश नाईक,आयपीएस स्वाती सिंग,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हरेश मयेकर, हरमलचे सरपंच मनोहर केरकर उपस्थित होते.

सक्सेना म्हणाले, की किनारी भागात पर्यटकांची ये- जा असल्याने विशेषतः गेस्ट हाऊस, हॉटेल्स व घरे भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांची ओळखपत्रे, पत्ता व कोठून आले व कोठे जाणार आहेत,आदींची नोंद करण्याची गरज आहे. व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक बनले आहे. तसेच विदेशी पर्यटकांचे ‘सी फॉर्म’ नोंदणी व कायद्याचे उल्लंघन न करण्याचा सल्ला दिला पाहिजे. एखाद्या आपत्कालीन वेळेत 112 वर संपर्क करून स्थितीची माहिती देऊन पोलिस मदत घेऊ शकता, असेही त्यांनी सांगितले.

Shobit Saxena
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो

पेडणे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक व उपअधीक्षक सुदेश नाईक तसेच पोलिस अधीक्षक सक्सेना आदींनी हरमलचे खून प्रकरण, दोन चोरी प्रकरणांचा छडा लावताना दाखवलेली निष्ठा व जीवाची बाजी तसेच साहसी वृत्तीमुळे पेडणे पोलिसांनी नाव कमावले आहे.अशा बैठका किनारी भागात वर्षातून दोन-तीन वेळा घ्यायला हव्यात. पोलिस-नागरिक यांच्यात सुसंवाद असला तरच गुन्हे कमी होतील,असे सम्राट क्लब पेडणेचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी पोलिसांचे अभिनंदन करताना सांगितले.

हरमलात नायजेरियन युवती वेश्या व्यवसायात असून किनारी भागात त्यांचा व्यवसाय चालतो, पोलिस नेमके काय करतात, असा सवाल संजय मयेकर यांनी केला.

पोलिस उपअधीक्षक दर शनिवारी गाऱ्हाणी ऐकणार !

कोणीही स्थानिक व परप्रांतीय असा भेदभाव न करता व्यवसाय केला पाहिजे.प्रत्येक व्यावसायिकाने रूम बॉय, सुरक्षा कर्मचारी आदींची माहिती योग्य पध्दतीने पोलिसांकडे द्यायला हवी व ती माहिती घेतली तरच गुन्हेगारी आटोक्यात आणू शकतोदर शनिवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत पेडणे पोलिस स्थानिकांत पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक गाऱ्हाणी ऐकून घेतील व समस्यांचे निराकरण करतील,असे सक्सेना यांनी सांगितले. सुसंवाद बैठक पर्यटन हंगामाच्या प्रारंभी नोव्हेंबर महिन्यात घेतली पाहिजे,आता घेऊन काय उपयोग.

अंमलीपदार्थ, वेश्याव्यवसाय व ध्वनी प्रदूषणासारखे नियमबाह्य व्यवहार पोलिसांच्या देखत चालू असून ते रोखण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. पोलिसांना पंच व लोकांचे पूर्ण सहकार्य असूनही अनैतिक व्यवहार सुरूच आहेत. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

- इनासियो डिसोझा, पंच सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com