खुशखबर; गोव्यात आता पर्यटकांना मिळणार हेलिकॉप्टर राईड, सीप्लेनची सेवा

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉप ऑन हॉप ऑफ बसही लवकरच होणार सुरु
Helicopter Ride & Seaplane Services  in Goa
Helicopter Ride & Seaplane Services in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जगभरात टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्याने आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आता विविध सेवा देण्याचा निर्धार गोवा टुरिझमने केला आहे. याचाच एक भाग म्हणून हेलिकॉप्टर राईड, सीप्लेन आणि जमिनीसह पाण्यावरही चालेल अशा बसची सेवा पर्यटकांना देण्याचं नियोजन सुरु आहे.(Helicopter Ride & Seaplane Services in Goa)

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपासून ओल्ड गोवा हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याचा मानस असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. मागच्याच वर्षी या हेलिपॅडचं काम पूर्ण झालं आहे. मुंबईस्थित कंपनीचा एका स्थानिक कंपनीशी करार झाला असून या सेवेचं सर्व नियोजन आणि देखभाल स्थानिक संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यातून पर्यटन विभागाला वर्षाकाठी तब्बल 60 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे.

हेलिकॉप्टर राईडसाठी विविध परवानग्या घेण्याचं काम सुरु आहे. परवानग्या मिळाल्यानंतर ही सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागच्याच महिन्यात एका खासगी कंपनीने गोव्यात हेलिकॉप्टर सेवा सुरु केली असून आगुआदा किल्ल्यावरुन याची चाचणीही घेण्यात आली आहे. यासोबतच सीप्लेन सेवेसाठी एका कंपनीशी करार केला जाणार असून त्यासाठी डिसेंबरपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

Helicopter Ride & Seaplane Services  in Goa
युक्रेनियन नागरिकाचा गोव्याच्या बाणावलीत मृत्यू; कारण गुलदस्त्यात

गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तसं लहान राज्य असल्याने तीन-चार दिवसात पर्यटकांचं गोवा दर्शन पूर्ण होतं. त्यामुळे पर्याय संपलेल्या पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना आणखी काही दिवस गोव्यात वास्तव्य करण्यास भाग पाडण्यासाठी अशा सेवांचा उपयोग होईल अशी पर्यटन खात्याला आशा आहे. गोव्यात थीम पार्क, झू किंवा फॅमिली पार्क नसल्याने अशा प्रकारच्या सेवांचा आधार घेणं खात्याला क्रमप्राप्त आहे. मात्र अशा सेवा देताना खात्याला विविध आव्हानांचा सामनाही करावा लागणार आहे.

गोव्यात सध्या पर्यटकांसाठी काही सेवा दिल्या जातात, ज्यात एअर बलून, बंजी जम्पिंगसारख्या सेवांचा समावेश आहे. एअर बलून सेवा पावसामध्ये बंद ठेवली जाते. तसंच बंजी जम्पिंगही पावसाळ्यात बंद ठेवलं जात असल्याने नवीन सेवा आणण्याचा मानस पर्यटन खात्याकडून व्यक्त केला गेला आहे. गोव्यात पर्यटकांकडून मॉन्सून ट्रेकलाही मोठी पसंती मिळते. तर दुसरीकडे पर्यटकांचं आकर्षण असलेलं राजभवनही कोरोना लॉकडाऊननंतर पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. यासोबतच पणजीत सध्या बंद असलेली हॉप ऑन हॉप ऑफ बससेवाही लवकरच पूर्ववत सुरु केली जाणार आहे. जमिनीसह पाण्यावर चालणाऱ्या बसची सेवाही नोव्हेंबरअखेरपर्यंत पर्यटकांसाठी खुली करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही बससेवा एकाच ऑपरेटरच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com