Valpoi News : हेदोडे-ठाणे जोडरस्ता अखेर खुला : वाहनचालक समाधानी

Valpoi News : नगरगाव, डोंगुर्ली-ठाणे, म्हाऊसवासीयांची सोय
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्यातील नगरगाव, डोंगुर्ली-ठाणे, म्हाऊस या ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकांसाठी सोयीचा ठरणाऱ्या हेदोडे-ठाणे रस्त्याला जोडणारा रस्ता अखेर वाहनचालकांसाठी खुला झाला आहे.

हेदोडे गावातून ठाणे रस्त्यावर जाताना वाटेत ओहळ असून तिथे काही वर्षांपूर्वी नवीन रुंद पुलाची बांधणी करण्यात आली होती. पण पुलापलीकडील सुमारे शंभर मीटरचा कच्चा रस्ता वनक्षेत्रात येत असल्याने डांबरीकरण करता येत नव्हते.

पण वनमंत्री विश्‍‍वजीत राणे व वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा पर्येच्या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनी या रस्‍त्‍याच्‍या कामासाठी सरकारी दरबारी पाठपुरावा करून काम करून घेतले.

Valpoi
Goa: गोव्यात बस प्रवासादरम्यान महिलांसोबत विनयभंगाचे प्रकार, सुरक्षा पुरविण्याची आवदा यांची मागणी

रस्‍ता पूर्णपणे पेव्‍हर्सचा

मार्च महिन्यात या रस्‍त्‍याच्‍या कामाची पायाभरणी करण्यात आली होती. हा पुलाकडील भाग वनविभागात येत असल्याने कच्चा रस्त्यावर आधी सिमेंट खडीचा गालिचा टाकून त्यावर पेव्हर्स बसवून रस्ता करण्यात आला आहे.

रस्ता पेव्हर्सचा असल्याने गेले अडीच महिने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पण आता आता तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com