Heavy vehicles
Heavy vehicles Dainik Gomantak

Goa Traffic: सावंतवाडी, बाणास्तरीतून पणजीकडे येणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा बंदी; 'या' तारखेपर्यंत अंमलबजावणी

पणजीतील वाहतुक कोंडीवर उतारा

Goa Traffic: गोव्याची राजधानी पणजीत सोमवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पणजीतील रस्त्यांची अंतर्गत कामे, अटल सेतू वाहतुकीसाठी बंद असणे यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, आता उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सावंतवाडी आणि बाणास्तरीतून पणजीकडे येणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा बंदी घातली आहे.

Heavy vehicles
Goa Police in Anjuna: उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर; हणजुणे परिसरात राबवली विशेष मोहिम

सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहनांवर ही बंदी असणार आहे. 27 मार्चपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. सावंतवाडीतून येणारी वाहने बांदा येथे तर बाणास्तरी येथून येणारी वाहने पुलावरून वळवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पणजीतील मांडवी नदीवरील अटल सेतू 27 मार्चपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. याच कारणामुळे सोमवारी पणजीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता.

पर्वरी ते पणजीपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्‍या. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना दिवसभर कसरत करावी लागली.

राजधानी पणजीत ठिकठिकाणी ‘स्मार्ट सिटी’ची कामे सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. जी-20 परिषदेच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे वाहतुक कोंडीत भर पडली आहे.

Heavy vehicles
GCA General Meeting: डॉ. भाटीकर यांना दिलासा; बडतर्फीऐवजी कारणे दाखवा नोटीस; महिला प्रीमियर लीग 1 एप्रिलपासून

जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यामुळे सर्व कामे एकाच वेळी सुरू आहेत. त्‍यामुळे वाहतुकीच्‍या कोंडीत भर पडत आहे

सोमवारच्या या वाहतूक कोंडीनंतर पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. त्यात ‘अटल सेतू’ बंद केल्यामुळे सर्व अवजड वाहनांची वाहतूक नव्या मांडवी पुलावरून होत असल्याने या कोंडीत आणखी भर पडत असल्याचे म्हटले होते.

त्यामुळे अवजड वाहतूक दिवसा बंद ठेवावी आणि रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच अवजड वाहतुकीस परवानगी द्यावी, असा उपाय सुचविला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com