Chorla Ghat: चोर्ला घाटात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तीन-तेरा

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा देण्यात आली होती
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा-बेळगाव या चोर्ला घाटातून जाणाऱ्या महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा देण्यात आली होती मात्र, या महामार्गावर दिवसाही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.

(Heavy vehicle access to Chorla Ghat during daytime Violation of Collector rules order )

Chorla Ghat
Crime News: कळंगुटमध्ये किशोरवयीन मुले गुन्हेगारीच्या विळख्यात!

पोळे मार्गे बेळगावला जाण्यासाठी 160 किलोमीटरचे अतिरिक्त अंतर कापावे लागते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बेळगाववरून येणारी वाहने परत पाठवणे शक्य नसल्याने दोन हजार रुपयांचा दंड देऊन तसेच त्यांचा नंबर नोंद करून प्रवेश दिला जात होता.

रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा देण्यात आली होती

दरम्यान, चोर्ला घाटातून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुभा देण्यात आली आहे. वाहतूक खात्याने या वाहनांचे क्रमांक नोंद केले आहेत. ही वाहने पुन्हा राज्यात आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. सध्या अनमोड घाट बंद असल्यामुळे अवजड वाहतुकीला गोव्यात येण्यास समस्या निर्माण होत आहेत.

वाहने वळवण्यात अडचणी

बेळगावहून गोव्यात येणारी वाहने परतवून लावणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण गोवा राज्याच्या हद्दीत वाहने वळवण्यासाठी पुरेशी जागा नाही. मात्र, ही वाहने सुर्ला येथे कर्नाटक तपासणी नाक्यावर रोखणे शक्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणी गोवा पोलिसांची नेमणूक करावी आणि तेथेच वाहतूक रोखावी किंवा वाहने परत पाठवावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com