गोवा किनारपट्टीसह गुजरात राजस्थानमध्ये येत्या 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता: IMD

हवामान एजन्सीने म्हटले की, "कोकण, गोवा किनारपट्टी, कर्नाटक, केरळ आणि माहेमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पुढे सरकत चाललेला मान्सून आता पंजाब आणि हरियाणा व्यापत आहे. राजस्थानचा बहुतांश भागही मान्सूनच्या ढगांनी व्यापला गेला आहे. भारतीय हवामान खात्याचे (IMD) म्हणणे आहे की येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरित राजस्थान आणि गुजरातमध्येही मान्सून हजेरी लावेल आणि त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापेल. (Heavy rains expected in Gujarat Rajasthan along Goa coast in next 2 days IMD)

Monsoon Update
'...प्रेमाशिवाय पत्नीकडून पैसे घेणेही क्रूरता, कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हवामान खात्याने (IMD) सांगितले की, उत्तर-पश्चिम राजस्थान पासून बंगालच्या उपसागरापर्यंत खालच्या पातळीवर कमी दाबाची रेषा तयार झाली, ज्यामुळे ओलावा आणि वारे येत वाहत आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 5 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील 5 दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या भागात पुढील 4-5 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

कोकण, गोवा, केरळ आणि कर्नाटकसह दक्षिणेकडील राज्यांमध्येही पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान एजन्सीने म्हटले की, "कोकण, गोवा किनारपट्टी, कर्नाटक, केरळ आणि माहेमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि अंतर्गत कर्नाटकात पुढील 5 दिवसांत विखुरलेला पाऊस पडू शकतो."

Monsoon Update
लष्कर-ए-तैय्यबाच्या पाच दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक, मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

पुढील काही दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे 2 आणि 5 जुलै रोजी पावसाच्या हालचाली पहायला मिळणार आहे. शनिवारी गुजरात प्रदेश, कोकण आणि गोव्यात पृथक मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com