Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak

Goa Rain Alert : गोव्यात 15 जुलैपर्यंत तुफान पाऊस

1 जून ते आज सकाळपर्यंत राज्यात 64.52 इंच पावसाची नोंद
Published on

गोव्यात काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांची पडझड झाली आहे. हवामान खात्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवतल्यावर गोवा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाले होते.

Goa Rain Update
नोकरीची पदे गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील; CM प्रमोद सावंत

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे.

दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या संभाव्य तीव्रतेमुळे, 12 जुलैपासून गोव्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. 11 ते 15 जुलैपर्यंत मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या 72 तासांत मुसळधार पावसामुळे राज्यात पडझड, रस्‍ता वाहून जाणे, वीजवाहिन्‍या तुटणे आदी कारणामुळे सुमारे 16 लाखांचे नुकसान झाले असल्‍याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने व्‍यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com