Goa: मुसळधार पावसाने वास्कोत जनजीवन विस्कळीत

वास्कोत (Vasco) रविवारी मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं. संपूर्ण वास्को शहर जलमय करून सोडले.
Heavy Rain in Vasco
Heavy Rain in VascoDainik Gomantak

दाबोळी - वास्कोत (Vasco) रविवारी मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं. संपूर्ण वास्को शहर जलमय करून सोडले. शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन रहदारीवर मोठा परिणाम झाला. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.आज पहाटेपासून पावसाने कहर माजवला. मुख्य म्हणजे काल सुट्टीचा दिवस असल्याने जनजीवनावर तितका परिणाम जाणवला नसला तरी बाजारात खरेदी करण्यात आलेल्या लोकांना पावसाचा कहर जाणवला. शहरात अनेक ठिकाणी रस्ते पाण्यासाठी गेले होते. त्यामुळे वाहनचालकांना या पाण्यातून वाट काढावी लागली, बरीच कसरत करावी लागली. जरी काल सुट्टी असली तरी बाजारपेठ चालू होती. पावसामुळे येथील चर्च सर्कल ते वाडे पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी भरून असल्याने वाहन चालकांना पडलेल्या खड्ड्यांचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे वाहने खड्ड्यात आढळत होती.

दरम्यान शहरातील स्वतंत्र पथ मार्ग, येथील एफ एल गोम्स रोड, देस्तेरो जवळील मार्ग संपूर्ण पाण्याखाली गेले होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची बरीच तारांबळ उडाली. त्यांचा दिवस घरातील पाणी काढण्यात गेला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम चालू असून त्यामुळे पाण्याची मुख्य वाट बंद झाल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली.

Heavy Rain in Vasco
COVID-19 Goa: संचारबंदी २६ जुलैपर्यंत वाढवली; काय राहणार चालू, काय बंद

दरम्यान मुरगाव हार्बर (Mormugao) येथे डोंगराळ भागाची दरड कोसळल्याने या ठिकाणी असलेल्या चौगुले कार्यालयाला धोका निर्माण झाला आहे. हे कार्यालय दर्या किनारी असून खाली खोल खाई आहे. या कार्यालयात जाणारा रस्ता खचला असून कार्यालयाचे मुख्य गेट, पेव्हर निखळले आहेत. या रस्त्यावरून कार्यालयात वाहने ये-जा करतात. उद्या सोमवार कार्यालयीन कामकाज दिवस असून कर्मचाऱ्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. या व्यतिरिक्त इतर लहान-मोठ्या पडझडी झाल्याचे पाहण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com