Sanquelim
SanquelimDainik Gomantak

Sanquelim: मुसळधार पावसाने घरावर झाडे कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल
Published on

राज्यात सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर आज साखळी येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामूळे साखळीच्या ग्रामीण परिसरात आज पुर्ण वाढ झालेली आंबा अन् माडाची दोन झाडे उन्मळून घरावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

(Heavy rains caused trees to fall on houses at Sanquelim)

 Sanquelim
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 6 देशांतील तरुणांशी साधला संवाद

मिळालेल्या माहितीनुसार साखळीच्या ग्रामीण परिसरात आज दोन पुर्ण वाढ झालेली आंबा अन् माड झाडे उन्मळून घरावर पडल्याची घटना घडली आहे. त्यामूळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे.

 Sanquelim
Fire safety Audit| सरकारी विभागांचे फायर सेफ्टी ऑडिट सुरू : CM प्रमोद सावंत

याबाबत स्थानिकांनी आपली प्रतिक्रीया देताना बऱ्याचवेळा प्रशासनाला या झाडांना तोडले जावे यासाठी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही भुमिका न घेतल्यामूळे आज हा प्रकार घडला असल्याचं सांगितले. तसेच यापूढे असे प्रकार होऊ नयेत. यासाठी धोकादायक झाडांची छाटनी होणे आवश्यक आहे. ती करावी असे ही म्हटले आहे. कारण कोणती ही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण ? असा सवाल ही नागरिकांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com