गोवा :सोमवारी वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला होता. अंदाजे 3 इंच पाऊस पडला. आजच्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाताहत झाली. शेतात पाणी तुंबले. त्यामुळे शेतीच्या कामांना आता जोर येईल. जूनअखेरपर्यंत 38 इंच पावसाची नोंद झाली होती. आता तो 41.22 इंच झालाय. पूर्वी गोव्यात 105 इंच पाऊस पडत असल्याची नोंद भूगोलाच्या पुस्तकात असायची. आता पाऊस डिसेंबरपर्यंत अविरत कोसळतो आणि 130 इंच पावसाची नोंद ठेवून जातो. हा पाऊस कोसळण्याचे प्रमुख कारण वातावरण बदलाचा परिणाम, हेसुद्धा आता पचनी पडायला लागले आहे.
परंतु जे वैज्ञानिकांना दिसते ते आमच्या सरकारच्या लक्षात येत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे मोठमोठे हायवे आम्ही बांधतो, परंतु त्यावरती पाणी साचते. गोमेकॉच्या समोरील सबवे मोठ्या उत्साहाने बांधण्यात आला होता. सध्या त्याचा स्विमिंग पूल बनला आहे. देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या एल ॲण्ड टीने( L&T) मांडवी पूल उभारला. त्याच्यावरचे काँक्रीट पहिल्या पावसात उडून जाते. गोवा सरकारलाही त्याची पर्वा नसते, तेव्हा कोण काय करणार? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.