PM Narendra Modi: मडगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जोरदार तयारी

PM Narendra Modi: ‘विकसित भारत’चे होणार उद्‌घाटन : बसस्थानकाचे ‘एसजीपीडीए’वर स्थलांतर
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी रोजी मडगावात येत असून कदंब बसस्थानकावरील खुल्या जागेत ‘विकसित भारत प्रदर्शना’चे उद्‌घाटन करणार आहेत व त्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त मडगावच्या कदंब बसस्थानकावर तयारीला वेग आलेला आहे.

PM Narendra Modi
Invest Goa 2024: रोजगाराच्‍या हजारो संधी 200 कंपन्‍या उत्‍सुक!

प्रदर्शनासाठी तंबूची उभारणी सुरू झाली आहे. बाजूला नव्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंतर राज्य बसस्थानकाचे स्थलांतर ओशिया इमारतीसमोरील एसजीपीडीए मैदानावर करण्यात आले आहे. बस स्थानकावरील सभोवताली असलेले गाडे दोन दिवसांपूर्वीच तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

1 फेब्रुवारीपासून बससेवेच्या जागेत बदल

1 फेब्रुवारीपासून कदंब बसस्थानकावरील स्थानिक बससेवा बंद करून फातोर्डा स्टेडियमच्या बाजूला कृत्रिम टर्फ फुटबॉल मैदानाच्या बाजूला असलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल. या जागेत माती आणून घालणे व जागेच्या सपाटीकरणाला सुरवात झाली आहे. कदंब बसस्थानकासमोरील रस्त्याचे रुंदीकरणही सुरू झाले आहे.

भिकाऱ्यांवर असेल करडी नजर :

या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. कोलवा सर्कल ते कदंब बसस्थानकापर्यंत भिकारी पुष्कळ आहेत. त्यांना या परिसरात फिरकू दिले जाणार नाही. याव्यतिरिक्त वेर्णा औद्योगिक वसाहतीकडील जंक्शनवरही कडक पहारा ठेवला जाईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी १ श्रीनेत कोठवाले यांनी दिली.

वाहतूक आराखड्याची आखणी

रस्त्यावरील वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जास्तकरून मडगाव ते पणजी किंवा वास्को जाणारी वाहने फातोर्डा दामोदर लिंग, आर्लेम सर्कल या बाजूने सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे माथानी साल्ढाणा प्रशासकीय इमारत ते कोलवा सर्कलपर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Census 2027 Questionnaire New Changes Rule
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com