Silly Souls Cafe & Bar: ‘सिली सोल्स’परवाना नूतनीकरण आव्हान अर्जावर आज सुनावणी

त्यासंदर्भातची नोटीस अर्जदाराला मिळाली आहे.
Silly Souls Cafe & Bar
Silly Souls Cafe & BarDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथे केंद्रीयमंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून कथितरित्या चालवल्या जाणाऱ्या वादग्रस्त सिली सोल्स कॅफे अँड बार यासंदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त नारायण गाड यांनी गेल्यावर्षी दिलेल्या आदेशाविरुद्ध ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आव्हान दिले आहे. हा आव्हान अर्जावर उद्या ६ मार्चला मुख्य सचिवासमोर सुनावणीला होणार आहे. त्यासंदर्भातची नोटीस अर्जदाराला मिळाली आहे.

उत्पादन शुल्क आयुक्तांनी त्यांच्या आदेशात सिली सॉल्स कॅफे अँड बारचा अबकारी परवाना जो मृत व्यक्तीच्या अँथनी डी’गामा नावाने नूतनीकरण करण्यात आला होता तो त्याच्या विधवेकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली होती असे निरीक्षण करत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केलेले मुद्दे फेटाळले होते.

उत्पादन शुल्क खात्याने मृत व्यक्तीच्या नावावर केलेला अर्ज परवान्याच्या नूतनीकरणासाठी स्वीकारला होता. त्यामुळे खात्याने केलेली प्रक्रिया बेकायदेशीर तसेच फसवणूक करणारी आहे. अर्ज अँथनी डिगामा यांच्या नावाने असताना त्यांच्या पत्नीच्या हस्तांतरित केल्याने ॲड. रॉड्रिग्ज यांनी आव्हान अर्ज सुमारे विविध 33 मुद्दे उपस्थित केले आहेत.

Silly Souls Cafe & Bar
Cars Gutted In Fire: आगीचे सत्र सुरूच; वास्कोत चार चारचाकी जळून खाक

दहा वर्षासाठी मासिक भाडेपट्टी!

ज्या ठिकाणी सिली सॉल्स कॅफे अँड बार आहे, तो परिसर मासिक भाड्याने १० वर्षांच्या कालावधीसाठी अँथनी डगामा यांनी एटॉल फूड अँड बेव्हरेजेसला भाड्याने दिला होता.अँथनी डगामा यांनी अबकारी परवान्यासाठी अर्ज केला, तेव्हा ती जागा आधीच एईटॉल फूड अँड बेव्हरेजेसला भाड्याने देण्यात आली होती.

जी उग्रेया मर्केंटाइल प्रायव्हेट लिमिटेडच्या भागीदारीत कार्यरत आहे, जे केंद्रीयमंत्र्यांचे पती आहेत. ॲड. रॉड्रिग्ज यांनी मांडलेले मुद्दे उत्पादन शुल्क आयुक्तांनी पूर्णविचारांती फेटाळून लावले होते.

Silly Souls Cafe & Bar
Corona Patients Updates: कोरोनाचे एकूण नवे 16 बाधित

अॅंथोनीच्या निधनानंतर नूतनीकरण

गेल्या वर्षी 20 जुलै रोजी उत्पादन शुल्क आयुक्तांसमोर दाखल केलेल्या तक्रारीत ॲड. रॉड्रिग्ज यांनी बेकायदेशीर पद्धतीने जानेवारी 2021 मध्ये अँथनी डी''गामा यांच्या नावाने अबकारी परवाना जारी केला होता आणि नंतर त्यांच्या निधनाच्या एक वर्षानंतर जून 2022 मध्ये त्यांच्या नावावर नूतनीकरण केले होते, याकडे लक्ष वेधले होते. त्यासंदर्भातची माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेला दस्तावेजही रॉड्रिग्ज यांनी सादर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com