Goa Politics: त्या १० आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

याचिकादारांचे वकील कपिल सिब्बल हे उपलब्ध नसल्याने सुनावणी तारीख पुढे ढकलली
आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये गेलेल्या १० आमदार (Goa Politics)
आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये गेलेल्या १० आमदार (Goa Politics)Dainik Gomntak

Goa Politics: आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये गेलेल्या १० आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेवर (Disqualification petition on 10 MLA's) २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे (Hearing on September 22). आज याचिकादारांचे वकील कपिल सिब्बल हे (Lawyer Kapil Sibbal) उपलब्ध नसल्याने याचिकादारांच्या वकीलांनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये गेलेल्या १० आमदार (Goa Politics)
कॉंग्रेस पक्षात फितूरांना स्थान नाही: अवधूत आमोणकर

इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडीस व नीळकंठ हळर्णकर या आमदारांना अपात्र ठरवावे अशी याचिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सभापतींसमोर सादर केली होती. सभापतींनी याचिका फेटाळल्यानंतर चोडणकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या आमदारांनी भाजप प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा कॉंग्रेसचा आरोप असून या आमदारांवर गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी कॉग्रेस न्यायालयात गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com