Vishwajit Rane : आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं; 6 दिवस घेणार विश्रांती

तब्येत बिघडल्याने घेणार विश्रांती
Health Minister Vishwajit Rane took booster dose
Health Minister Vishwajit Rane took booster doseDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आरोग्याच्या कारणास्तव पुढील सहा दिवस नियोजित दौरे, सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत. याबाबतची माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी माहिती देताना म्हटलं आहे.

(Health Minister Vishwajit Rane will not be able to meet citizens for the next 6 days due to health reasons)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळच्यादरम्यान गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना अस्वस्थ वाटू लागले, यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करत विश्रांतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार ते पुढील 6 दिवस (22 डिसेंबर पर्यंत ) विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे नियोजित दौरे, सार्वजनिक, जनसंपर्क होऊ शकणार नाही. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहेत. असे असले आरोग्याचे नेमके काय कारण आहे? याची माहिती मिळू शकलेली नाही.

Health Minister Vishwajit Rane took booster dose
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील तीन दिवस राज्यात उपल्बध असणार नाही अशी माहिती राज्यातील नागरीकांना दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देताना स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत 16 डिसेंबर रोजी पासून तीन दिवस राज्याबाहेर असणार आहेत. त्यामुळे राज्यातील त्यांचे सर्व कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. ते 18 डिसेंबरपर्यंत राज्याबाहेर असतील अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO Goa) वतीने देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com