Goa News : भाजप प्रदेशाध्यक्षपदी दयानंद सोपटे यांच्या नावावर खल; दिल्लीतील बैठकीत चर्चा

Goa News : सप्टेंबरमध्ये निवडणूक; राष्ट्रीय स्तरावरही होणार खांदेपालट
bjp
bjp Dainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

Goa News :

पणजी, भाजपने विधानसभेची पुढील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भंडारी कार्डचा पद्धतशीरपणे वापर करण्याचे ठरविले आहे. यासाठी माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे भाजप लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोपविणार आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ संपला असून लोकसभा निवडणुकीमुळे प्रदेशाध्यक्षपद निवडीसाठी मतदान घेण्याची प्रक्रिया केली नव्हती.

दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी भूपेंद्रसिंह यादव यांची निवड करण्याचा विचार वरिष्ठ नेत्यांनी चालविला आहे. यासाठी दिल्लीत झालेल्या एका पक्ष संघटनात्मक पातळीवरील बैठकीत गोव्याविषयीही चर्चा करण्यात आली.

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष आदी उपस्थित होते. गोव्यातील इतर मागासवर्गीयांतील सर्वांत मोठ्या भंडारी समाजाने भाजपसोबत राहावे यासाठी काय करावे लागेल, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याच बैठकीत सोपटे यांच्या नावाविषयी चर्चा झाली.

भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीबाबत प्रदेश पातळीवर महिनाभराने माहिती देण्याचेही ठरविले आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ऑगस्टमध्ये होणार असून त्यानंतर प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मतदानाची औपचरिकता पार पाडली जाणार आहे. हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर मंदिरात

पालखी प्रकरणावरून झालेला वाद, त्यामुळे दुखावलेला भंडारी समाज आणि अखेरच्या क्षणी उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना विजयी करण्यासाठी झटलेले भंडारी नेते आदींची दखल या बैठकीत तपशीलाने घेण्यात आली.

सोपटे यांचे नाव प्रदेश पातळीवरील एका वजनदार मंत्र्यानेच दिल्लीला प्रदेशाध्यक्ष पदासाठी पोचविले आहे. याआधी सोपटे यांना लोकसभेची उत्तर गोव्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी त्याने वजन खर्ची घातले होते.

मात्र, उत्तर गोव्यातील उमेदवारीबाबत प्रयोग नको, अशी भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सदानंद शेट तानावडे यांनी घेतल्याने श्रीपाद यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. भंडारी समाजातूनच नव्या नेतृत्वाला वाव दिला पाहिजे, असे भाजप श्रेष्ठींचे म्हणणे पडल्याने सोपटे यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोहोर सप्टेंबरमध्ये उमटविणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी भंडारी समाज भाजपसोबत राहिला पाहिजे, यासाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. भंडारी समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देण्यासह अन्य उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. काही मतदारसंघांत पक्ष संघटना बळकट करून बड्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्याचे धाडसही भाजप दाखवणार आहे. त्याची पूर्वतयारी सोपटे यांच्या निवडीच्या रूपाने केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जबाबदारी स्वीकारणार

पक्षाने दिलेले जबाबदारी मी आजवर स्वीकारत आलो आहे आणि यापुढेही स्वीकारेन. मात्र, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत माझ्याशी अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केलेली नाही.

- दयानंद सोपटे, माजी आमदार.

bjp
Goa News : गोव्यात गुन्हे तपासाचे प्रमाण कमी : अधीक्षक राहुल गुप्ता

विधानसभेसाठी रणनीती

विधानसभा निवडणुकीवेळी भंडारी समाज भाजपसोबत राहिला पाहिजे, यासाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. भंडारी समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देण्यासह अन्य उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. काही मतदारसंघांत पक्ष संघटना बळकट करून बड्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्याचे धाडसही भाजप दाखवणार आहे. त्याची पूर्वतयारी सोपटे यांच्या निवडीच्या रूपाने केली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com