Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

Harmal Road : लोखंडी पिंपे रस्‍त्‍यावर ठेवून वाहनचालकांना सदर रस्ता धोकादायक बनला असल्‍याचा सावधानतेचा इशारा देण्‍यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal Road :

हरमल, आगराजवळ दोन्ही बाजूंनी साकवाची बांधणी न केल्याने हरमल-चोपडे प्रमुख रस्ता अपूर्णावस्थेत आहे. विशेष म्‍हणजे गेल्‍या काही महिन्‍यांपासून ही समस्‍या सतावत असूनही त्‍याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही.

लोखंडी पिंपे रस्‍त्‍यावर ठेवून वाहनचालकांना सदर रस्ता धोकादायक बनला असल्‍याचा सावधानतेचा इशारा देण्‍यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्‍या दोन महिन्‍यांपासून हा रस्‍ता धोकादायक स्‍थितीत आहे. संबंधित यंत्रणा एखाद्या अपघाताची तर वाट पाहत नाही ना? असा सवाल वाहनचालक उपस्‍थित करत आहेत. सदर रस्त्याचे खड्डे बुजवल्यास दोन महिने उलटले, मात्र साकवाची दुरुस्ती न करता दोन्ही बाजूंनी लोखंडी पिंपे ठेवली आहेत. त्या साकवावर सिमेंट लाद्या घालण्याचे काम बाकी आहे.

जोपर्यत सिमेंट लाद्यांनी साकव झाकला जाणार नाही, तोपर्यंत ही समस्‍या कायम राहणार आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्‍यामुळे ताबडतोब साकवाची दुरुस्‍ती करून अपघात टाळावेत, अशी सूचना वाहनचालक संदेश पायनाईक यांनी केली आहे.

सरकारने आचारसंहितेच्या कचाट्यातून विकासकामे विशेषत: रस्त्याची कामे वगळून अपघात टाळावेत, तसेच वाहनचालकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी सर्व थरांतून करण्‍यात येत आहे.

आचारसंहितेचा बडगा, मान्सूनपूर्व कामे खोळंबली

हरमल, मांद्रे भागांतील मान्सूनपूर्व कामे आचारसंहितेमुळे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ती उरकणे कठीण आहे. रस्‍त्‍यावर कित्येक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहते. तसेच अनेक ठिकाणी गटार सुविधा नसल्याने रस्‍त्‍यांना ओहोळाचे स्वरूप येते. त्याचा फटका नजीकची घरे व आस्थापनांना बसतो. पादचारी, दुचाकीस्‍वारांना जलाभिषेक होतो. साहजिकच मन:स्ताप सहन करावा लागतो, असे आणखी एका वाहनचालकाने सांगितले.

Harmal
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

सध्‍या या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची वर्दळ बरीच वाढलेली आहे. परिणामी अपघाताची शक्‍यता आणखी वाढली आहे. रात्रीच्‍या वेळी तर वाहनचालक गोंधळून जातात. त्‍यामुळे हरमल-चोपडे रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करणे आवश्‍‍यक बनले आहे. रात्रीच्या अंधारात एखाद्या अपघात घडण्याची शक्यता असून तत्पूर्वीच बांधकाम खात्याने काम हाती घेतले पाहिजे.

- संदेश पायनाईक, वाहनचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com