Bhandari Community In Goa: भंडारी समाजाचे सर्वेक्षण व्हायला हवे; बैठकीत ठराव

Bhandari Community In Goa Demand Survey : पेडणे भंडारी समाज अध्यक्षपदी उमेश तळवणेकर
Bhandari Community In Goa Demand Survey
Bhandari Community In Goa Demand SurveyDainik Gomantak

Bhandari Community In Goa Demand Survey:

ओबीसींच्या २५% आरक्षणातील २० टक्के आरक्षण हे भंडारी समाजाला देण्यात यावे, भंडारी समाजाचा राज्यात सर्वेक्षण व्हावे,अशा आशयाचा ठराव समाजाचे ज्येष्ठ नेते उपेंद्र गावकर यांनी मांडला. त्या ठरावाचे उपस्थितांनी स्वागत केले. समाजाच्या समस्या सुटण्यासाठी आरक्षण हवे,असा सूर बैठकीत उमटला.

भंडारी समाजाच्या पेडणे तालुक्यातील प्रतिनिधींची सभा नुकतीच पेडणे येथील श्री गडेवंश मंदिर मध्ये झाली. समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पेडणे तालुक्याची समिती निवडण्यात आली. उमेश तळवणेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बैठकीत अमृत आगरवाडेकर, संदीप उर्फ भाई वेर्णेकर, सुधीर कादोळकर, प्रभाकर मांडेलकर, संजय बर्डे, भोलानाथ घाडी, सुदेश किनळेकर आदींनी या बैठकीत विचार मांडले.

रुद्रेश्वर देवस्थान संदर्भात जो निर्णय तेथील भंडारी समाजाचे नेते निर्णय घेतील त्याला पेडण्यातील भंडारी समाज संपूर्ण पाठिंबा देतील, असा एकमुखी ठराव उपेंद्र गावकर यांनी मांडला तर विनोद मेथर यांनी अनुमोदन दिले.

पेडण्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी सांगितले,की पेडण्यात भेडसावणाऱ्या विषयांवर आपली समिती आवाज उठवेल.

Bhandari Community In Goa Demand Survey
Goa Accident Case: थिवी येथे अपघातात राजस्थानचा युवक ठार

नवी कार्यकारिणी अशी

अध्यक्ष-उमेश तळवणेकर, उपाध्यक्ष- गजानन गडेकर, अजय कळंगुटकर, देऊ गडेकर, उमेश गडेकर, सचिव -रुद्रेश नागवेकर, खजिनदार- रोहिदास भाटलेकर, सहसचिव- योगेश तळवणेकर, उपखजिनदार- शिवराम तुकोजी, सभासद- प्रशांत गडेकर, गुरुनाथ नाईक, चंदन बांदेकर, चंद्रकांत केरकर,

भगवान साळगावकर, कांता आसोलकर, किरण हळदणकर, राजू नरसे, अनिल गडेकर, विश्वास नारोजी, कृष्णनाथ भाईटकर, अनंत कांदोळकर, भगवान शेटकर, देविदास कांबळी, दीपक मांजरेकर, किशोर किनळेकर, विश्वास पालेकर शामसुंदर कोळजी, बाळू राऊळ, विश्राम गडेकर, सल्लागार- मधुकर कांदोळकर, मोहन तळवणेकर, विशाखा गडेकर, नीता नरसे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com