Harmal News : विदेशी तळीरामांना आवरा; हरमलवासीय त्रस्त

Harmal News : सध्या या भागातील तळीरामांचा वावर अनेकांच्या जिव्हारी लागला असून, पोलिसांनी किमान ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठवावे, अशी मागणी होत आहे.
Harmal
HarmalDainik Gomantak

Harmal News :

हरमल, येथील पर्यटन किनारी भागांत विदेशी पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक उत्साही असतात. मात्र गोव्याच्या प्रेमात पडलेले विदेशी ‘तळीराम’ पाहून, स्थानिकांच्या मते त्यांना लागलीच मायदेशी पाठवले पाहिजे, असे वाटते.

सध्या या भागातील तळीरामांचा वावर अनेकांच्या जिव्हारी लागला असून, पोलिसांनी किमान ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठवावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, झिंगलेल्या अवस्थेत जमिनीवर लोळणाऱ्या व्यक्तीस १०८ रुग्णवाहिका नेत नाहीत, ना पोलिस नेण्याचा वा ताब्यात घेण्याचा विचार करीत नाहीत.अशा द्विधा मनःस्थितीत पोलिस असल्याने हरमलवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काल ३१ रोजी दुपारी ३ च्या सुमारास विदेशी पर्यटक विलियम (रशिया) अक्षरशः तोल जाऊन पडला.स्थानिकांना शंका आल्याने त्यांनी १०८ रुग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले.

Harmal
Goa General Election: ज्यावेळी पणजी आणि मुरगाव मतदारसंघ होते, गोष्ट गोव्याच्या पहिल्या आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीची

१०८ रुग्णवाहिका पोहचली, नर्सने लागलीच तपासणी केली व ठीक असल्याचे सांगितले. मात्र, ह्यापूर्वी त्याला दाखल करून घेतले होते, नेण्याची गरज नाही. मात्र, दारूची नशा उतरली की ठीक होईल, असे सांगून १०८ रुग्णवाहिका निघून गेली.

हरमल बीच रोड वळणावर पडलेल्या पर्यटकांची हालत खराब झाल्याने ४ किमी.वरील मांद्रे पोलिसांशी संपर्क केला. तब्बल २५ मिनिटानंतर पोलिस दाखल झाले व त्याला ताब्यात घेऊन काय करणार, असा सवाल केला.तो दारूच्या धुंदीत असल्याने, त्याची झिंग उतरल्यावर ठीक होईल.

मद्यपी विदेशींच्या एकूण प्रकाराला स्थानिक कंटाळले आहेत. विदेशी पर्यटकांनी दारूच्या आहारी जाऊन जीवन बरबाद करणे आवडत नाही. कोविड काळानंतर अनेक पर्यटक आहारी गेले व त्यांना आणखी ‘तळीराम’ होऊ न देता,त्यांना मायदेशी पाठवले पाहिजे.

-प्रवीण वायगंणकर,माजी पंचसदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com