Harmal News : कलाकारांनी कलेत समरस व्हावे : नरेंद्र नाईक

Harmal News : हरमल येथील सिध्देश्वर संस्थेच्या नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप
Harmal
HarmalDainik Gomantak

Harmal News :

हरमल, प्रत्येक कलाकार कलेशी समरस होऊन नाटकात भूमिका साकारत असतो. त्यात बक्षीस व शाबासकी मिळाल्यास हुरळून न जाता, कलेची नम्रतेने सेवा करण्याची गरज असते, तेव्हाच कलाकार घडत असतो, असे प्रतिपादन नाट्यलेखक तथा भाग शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले.

हरमल येथील श्री सिध्देश्वर संस्था आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाट्य प्रशिक्षक अभय जोग, संस्थेचे अध्यक्ष संजय मयेकर उपस्थित होते.

चित्रपटापेक्षा नाटकातील कलाकार हा श्रेष्ठ असतो. नाटकाचे अनेक पैलू असून नऊ रस मिळून नाटक असते. त्या सर्व रसांचे अर्थात पैलू अभिनयातून सादरीकरण आवश्यक असते. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने घरबसल्या कोणतेही नाटक पाहू शकतो व शिकू शकतो, असेही नरेंद्र नाईक

यांनी सांगितले.

हरमलच्या श्री सिध्देश्वर संस्थेने उत्तम पद्धतीने नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले व गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी अभय जोग यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय मयेकर हे उत्तम नाट्य प्रशिक्षक असून त्यांचे मार्गदर्शन उत्तरोत्तर मिळेल व त्यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाट्य निर्मितीत चांगले सहकार्य देऊन नावलौकिक कमवा, असे आवाहन नरेंद्र नाईक यांनी केले.

Harmal
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

नाट्य प्रशिक्षक अभय जोग यांनी आपण जे शिकलात त्याचा वापर चांगल्या अभिनयातून करावा. एकमेकांशी संवाद साधून स्वतःचा विकास करावा. नाट्यशिक्षक संजय मयेकर यांनी स्तुत्य असा उपक्रम राबविला, असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय मयेकर यांनी प्रशिक्षणार्थींनी या शिबिरातून ज्ञान अवगत केले व त्याचा वापर संस्थेच्या नाट्य निर्मितीत करावा असे वाहन केले. या शिबिरात ४३ जणांनी सहभाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com