Harmal News : उदरगत संस्थेतर्फे मांद्रेत रुग्णवाहिका सेवा

Harmal News : अम्ब्रोज फर्नांडिस व पंच सुनीता बुगडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दयानंद मांद्रेकर यांनी आभार मानले.
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal News :

हरमल, मांद्रे मतदारसंघातील जनतेसाठी चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सदोदित प्रयत्न आहे. त्यासाठी उदरगत संस्थेतर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असल्याचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

मधलामाज, मांद्रे येथील मगोप कार्यालयापाशी रुग्णवाहिका लोकार्पणाचा सोहळा झाला. या सोहळ्यास केरीच्या सरपंच धरती नागोजी, पंच राजेश मांद्रेकर, रॉबर्ट फर्नांडिस, सुनीता बुगडे, किशोर नाईक, अबलेश तळकर, अनंत शेटगावकर आदी उपस्थित होते.

मांद्रे मतदारसंघात १०८ रुग्णवाहिका चांगली सेवा देत आहे, मात्र ती अन्य ठिकाणी व्यस्त असल्यास खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही सुविधा उपलब्ध करण्याची इच्छा होती. गेल्या महिन्यात केरी समुद्रकिनारी घडलेल्या घटनेमुळे आपण व्यथित झालो होतो.

त्यामुळे ही सेवा सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला. ही सुविधा २४ तास उपलब्ध असून गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोलकर यांनी यावेळी केले.

अम्ब्रोज फर्नांडिस व पंच सुनीता बुगडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दयानंद मांद्रेकर यांनी आभार मानले.

Harmal
Goa Traffic Police: गोवा पोलिसांनी मद्यपी चालकांना दाखवला 'पोलिसी खाक्या'; 249 गुन्हे दाखल; 2124 प्रकरणे उघडकीस

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य श्रेय ?

मांद्रे मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत जी आघाडी प्राप्त झाली त्याबद्दल आपण समाधानी आहे. भाजप व मगोपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन प्रचार केल्याने हे यश मिळाले. कोणी अन्य नेत्यांनी श्रेय घेत असल्यास आपण त्याविषयी भाष्य करणार नाही. आपल्या प्रचार कार्याची माहिती भाजप अध्यक्ष व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना माहीत असल्याचे आरोलकर यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com