Har Ghar Tiranga : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व भारतीयांसाठी एक गर्वाची बाब आहे, त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून साजरा करावा असे आवाहन समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले. देशभरासह गोव्यातही हर घर तिरंगा अभियान सरकारकडून मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.
केपे येथील आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या होली क्रॉस इन्स्टिट्यूट या शाळेतील विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची जागृती करण्यासाठी केपे बाजारात प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या फेरीचे उद्घाटन फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रभातफेरीत स्वतः फळदेसाई सामील झाले होते. केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, प्रसाद फळदेसाई, आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सुखटणकर, खजिनदार हर्षा रेगे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रणजित चिपळूणकर, मुख्याध्यापिका रश्मी डिसोझा, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत भाग घेतला. सुरवातीला सुखटणकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर मुख्याध्यापिका रश्मी डिसोझा यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.