पेडणे: धारगळ-पेडणे येथील धारेश्वर माऊली देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या (24 रोजी) रात्री 8 वाजता जयंत कामत लिखित ‘हँड्स अप’ नाटक गाववाडा-धारगळ येथील रवळनाथ रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे.
सातेरी कलामंदिर हसापूर प्रस्तुत या नाटकाचे दिग्दर्शन गोविंद नाईक यांनी केले असून, सूत्रधार सुहास मळीक आहेत. पार्श्वसंगीताची बाजू जवाहर बर्वे व ध्वनी संकलनाची बाजू प्रवीण च्यारी यांनी सांभाळली आहे. नेपथ्य व प्रकाशयोजना चंद्रशेखर बर्वे व दीपक बर्वे, वेशभूषा श्रुती देसाई व रंगभूषा साजुराम शेटगवकर यांची असणार आहे. त्याशिवाय सावळाराम नाईक, चैतन्य गवस, नितेश नाईक, सुजय परब, रितेश नाईक, अरुण पाटील व रोहिदास पाडलोस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या नाट्यप्रयोगात नीलेश नाईक, गोविंद नाईक, अरविंद नाईक, प्रजय मळीक, सुहास मळीक, श्रुती देसाई, अंकिता गवस यांच्या भूमिका आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.