पणजीतील हस्तकला ठरतायेत लक्षवेधी

‘झरोखा’चे आयोजन: 62 स्टॉल्स आणि शंभरेक कारागिरांचा सहभाग
Goa Handicraft
Goa Handicraft Dainik Gomantak

पणजी: बालभवन पणजी येथे आयोजित केलेल्‍या ‘झरोखा’ हस्तकला प्रदर्शनाचे उद्‌घाटन काल शनिवारी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्‍सेरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर रोहित मोन्‍सेरात, हस्तकला खात्याचे संचालक अरविंद बुगडे, बालभवनचे संचालक दयानंद चावडीकर, विभागीय संचालक पी. मल्लिकार्जुन, एसएससी साहाय्यक संचालक राजेश्वरी मेनडेल, संजीत कुमार उपस्थित होते.

Goa Handicraft
वीज घोटाळा प्रकरणाची सुनावणी 24 मार्च रोजी

‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सदर प्रदर्शनात हस्तकला, हातमाग आणि विविध राज्यांतील वस्तूंचे एकूण 62 स्टॉल्स आहेत. तसेच शंभरेक कारागीर सहभागी झाले आहेत. यात घरगुती सामान, कपडे, शोभेच्या वस्तू, साड्या, हॅण्ड प्रिटेंड कापड, लाकडावरची कलाकुसर, पेंटिंग्‍ज, नकली दागिने, केन बांबू, कोल्हापूरी चप्पल, बटीक प्रिंट आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन 27 मार्चपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.

2021-22 या कार्यकाळात पणजीत डिझाईन विकास, कौशल्य विकास, टूलकिटचे वितरण असे 20 उपक्रम झाले. पुढील वर्षी मार्केटिंग कार्यक्रमांचे गोव्यात आयोजन करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com