Illegal Dance Bar: "लडकी चाहिये क्या?" हडफडेच्या सरपंचांनी सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग; पर्यटन मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी

Night Club: गावचे सरपंच रोशन रेडकर यांनी गावात वाढत्या बेकायदेशीर डान्स बार आणि नाईट क्लबबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
Dance Bar
Dance BarDainik Gomantak
Published on
Updated on

हडफडे: गावचे सरपंच रोशन रेडकर यांनी गावात वाढत्या बेकायदेशीर डान्स बार आणि नाईट क्लबबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी गुरूवारी (२० मार्च) प्रशासन आणि पोलिसांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असलेले अनधिकृत बार आणि क्लब त्वरित बंद करण्यात यावे.

सरपंच रेडकर यांनी विशेषतः गोवा नाईट क्लब कडे लक्ष वेधले. हा क्लब बागा-हडफडे परिसरात श्रीमती अर्नेस्टिना परेरा यांनी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र शिवाय बेकायदेशीरपणे चालवला होता. त्यांनी या क्लबची आठवण करून देत बेकायदेशीर डान्स बार आणि नाईट क्लबवर स्थानिक प्रशासनानं त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

त्यांनी ही मागणी करताना एका धक्कादायक घटनेची आठवण करून दिली. जिथे दलाल त्यांच्याकडे बेकायदेशीर ऑफर घेऊन आला होता, "लडकी चाहिये क्या?" अशी विचारणा दलालाकडून करण्यात आली होती.

सरपंच रेडकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खौंटे आणि हणजूण पोलीस निरीक्षक सूरज गावस यांना बेकायदेशीर डान्स बार आणि नाईट क्लबवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.

स्थानिक प्रशासनानं या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं आणि तातडीनं कठोर कारवाई करावी, अशी सरपंच रेडकर यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com