Arpora Fire
Arpora FireDainik Gomantak

Arpora Fire: हडफडेतील गोदामाला भीषण आग; सामान जळून खाक

Arpora Guest house Fire: सर्किटमुळं हडफडे येथील एका गेस्ट हाऊसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
Published on

Fire Accident in Arpora Guest house

हडफडे: सर्किटमुळं हडफडे येथील एका गोदामला सकाळी १०:४५ वाजता आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, आग इतकी भीषण होती की, गोदामातील गाद्या आणि स्टेशनरीचं सामान जळून खाक झालं आहे.

पिळर्ण अग्निशमन दलाला सकाळी १०:४५ वाजता आग लागल्याची माहिती कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान सकाळी १०:५५ पर्यंत घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.परंतु गोदामात साठवलेल्या गाद्या आणि स्टेशनरीचं सामान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. सदरील गोदामाला शॉर्टसर्किटमुळं आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Arpora Fire
Goa Tourism: गोव्याच्या समृद्ध वारशाची झळाळी; ‘ओटीएम’मध्ये पर्यटनाच्या वचनबद्धतेचे प्रभावी प्रदर्शन

याआधी डिचोली शिरगाव येथे एका घराच्या स्टोअररूमला अचानक आग लागून सुवर्णालंकारासहित पाच लाख किमतीचं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घडना घडली होती.

आगीची घटना घडली, त्यावेळी खोलीत कोणीच नव्हतं. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आल्यानं संभाव्य दुर्घटना टळली. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास शर्थीचं प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com