Valpoi News : जीवनात गुरुशिवाय पर्याय नाही : प्रसन्ना गावस

Valpoi News : वाळपईत गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात
Valpoi
Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई, संगीत हे एक असे माध्यम आहे, जे सर्वांना सर्वांना आवडते. संगीत शिकण्यासाठी योग्य गुरूची गरज असते.

जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर गुरू शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रसन्ना गावस यांनी केले.

तबला संगीत अकादमी, वाळपई आणि मासोर्डे क्रीडा व सांस्कृतिक संघटनेच्या सहयोगाने आयोजित गुरू पौर्णिमा महोत्सवात गावस बोलत होत्या.

Valpoi
Goa Crime: ... अन् काही कळण्याच्या आतच त्याला मृत्यूनं गाठलं; गोव्यात नेमकं काय घडलं?

लक्ष्मीबाई मेमोरीयल सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमाला ह.भ. प. गुरुदासबुवा सुतार, अकादमीचे प्रमुख ज्ञानेश्वर नाईक, नगरगाव जि.पं.स. राजश्री काळे, उद्योजक ओंकार प्रभू, पत्रकार उदय सावंत, उद्योजक संजय हळदणकर, खोतोडा माजी सरपंच नामदेव राणे, सत्तरी मल्टिपर्पजचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस, मासोर्डे क्रीडा संघटनेचे अध्यक्ष कुंदन गावस, सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे आदींची उपस्थिती होती.

सुतार म्हणाले संगीताप्रमाणे ताल, लय अचूक पकडली की जीवनात माणूस यशस्वी होतो. यामागे दैवी संगीताची शक्ती आहे. गुरू शिवाय माणसांची मुक्ती नाही. राजश्री काळे, उदय सावंत, संजय हळदणकर, ओंकार प्रभू यांनी विचार मांडले. ज्ञानेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक केले. गीताश्रृती वझे यांनी सूत्रनिवेदन केले. कुंदन गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com