मित्रानेच केला घात! 90 लाखांचा गंडा घालून गुजरातच्या फॅशन डिझायनर तरुणीवर मुंबई, गोव्यात लैंगिक अत्याचार

Goa Crime News: एका फॅशन डिझायनरची तिच्या १५ वर्षीय मित्राने ९० लाख रुपयांची फसवणूक करुन मित्रांसोबत लैंगिक अत्याचार केला.
मित्रानेच केला घात! 90 लाखांचा गंडा घालून गुजरातच्या फॅशन डिझायनर तरुणीवर मुंबई, गोव्यात लैंगिक अत्याचार
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमधील सुरतमध्ये फॅशन डिझायनर तरुणीवर बलात्कार झाला. पीडितेने तिच्या 15 वर्षीय मित्रासह तिघांवर बलात्कार आणि 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुरतच्या सिटीलाईट परिसरात राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरची तिच्या १५ वर्षीय मित्राने ९० लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर तिच्यावर सुरत आणि गोव्यात नेऊन हॉटेलमध्ये करुन लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी परेश वानिया या संशयित आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात परेशसोबत त्याचे आणखी दोन साथीदारही होते. याप्रकरणी सूरतच्या उमरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांनी 16 लाखांचे दागिने कुठेतरी गहाण ठेवले असून उर्वरित 24 लाख रुपयांचे दागिने विकल्याचे तरुणीने सांगितले. उर्वरित रक्कम रोखीने घेतली, असे तरुणीने तक्रारीत सांगितले.

मित्रानेच केला घात! 90 लाखांचा गंडा घालून गुजरातच्या फॅशन डिझायनर तरुणीवर मुंबई, गोव्यात लैंगिक अत्याचार
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरुन चाकरमान्यांचा प्रवास होणार सुकर; महत्वाची अपडेट आली समोर

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली आरोपींनी तिची फसवणूक केल्याचे पीडितेने सांगितले.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे मुख्य आरोपी परेश लभूभाई वानिया याला अटक केलीय. परेश हा सुरतच्या पुना भागात राहतो. या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा समावेश आहे.

त्यात सुरेश घनश्याम भाई भुवा आणि अशोक रामजी भाई भुंगडिया यांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. सुरत, मुंबई आणि गोव्यात ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, त्या हॉटेलची चौकशी केली जाणार असून गहाण म्हणून ठेवलेले दागिनेही तपासले जातील, असे पोलिसांनी सांगितले. रोख रक्कम आणि गुंतवणुकीबाबतही चौकशी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com