धक्कादायक! पाकिस्तानचे हेरगिरी जाळे गोव्‍यात उद्‌ध्‍वस्‍त, माजी सुभेदारासह महिला अटकेत; संवेदनशील माहिती पाठवल्याचा संशय

Pakistan Spy Goa News: एटीएसच्या माहितीनुसार, हे दोघे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवेदनशील परिसर, लष्करी हालचाली, पोस्टिंग व तैनाती यांची माहिती मिळवून ती पाकिस्तानला पाठवत होते.
Pakistan Spy Goa News
Pakistan Spy Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुजरात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) एका व्यापक गुप्तहेर जाळ्याचा पर्दाफाश करताना गोव्‍यातून दोघा संशयितांना अटक केली आहे. त्‍यात माजी सुभेदार अजयकुमार सुरेंद्रसिंग सिंह (४७) याला नावेली येथून तर रश्मनी रवींद्रपाल हिला दमण येथून ताब्‍यात घेतले आहे. दोघेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. संवेदनशील लष्करी माहिती गोळा करून ती पाकिस्तानला पाठवण्याच्या कटात हे दोघे सक्रिय असल्याचा दाट संशय असून, त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.

अजयकुमार हा भारतीय लष्कराचा माजी सुभेदार आहे. त्याचा पाकिस्तानातील हँडलर्सशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर रश्मनी हिचाही पाकिस्तानातील दोन हँडलर अब्दुल सत्तार आणि खालिद यांच्याशी थेट संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एटीएसच्या माहितीनुसार, हे दोघे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवेदनशील परिसर, लष्करी हालचाली, पोस्टिंग व तैनाती यांची माहिती मिळवून ती पाकिस्तानला पाठवत होते. ही कारवाई अधीक्षक हर्ष उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अजयकुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो सध्या गोव्यातील एका डिस्टिलरीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता. २०२२ मध्ये नागालँडमधील दिमापूर येथे पोस्टिंग असताना त्याचा पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क आला.

त्यांच्या सूचनेनुसार त्याच्या मोबाईलमध्ये ट्रोजन मालवेअर इंस्टॉल करण्यात आले होते. या मालवेअरच्या माध्यमातून त्याचा मोबाईल ‘मिरर’ करून थेट माहिती मिळवली जात होती, असे एटीएसने सांगितले.

या प्रकरणात दोघांवरही भारतीय न्यायदंड संहितेच्या कलम ६१ व १४८ अंतर्गत राष्ट्रविरोधी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती मिळवणे, ती शत्रू राष्ट्राकडे पोहोचवणे आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी कारवायांना हातभार लावणे, असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्‍यात आले आहेत. ही कारवाई करताना गोवा पोलिसांसह केंद्रातील विविध तपास यंत्रणांची मदत घेण्यात आली होती.

दरम्‍यान, सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि खोट्या ऑनलाईन ओळखींच्या माध्यमातून पाकिस्तानी यंत्रणा भारतीय नागरिक तसेच सुरक्षा दलातील व्यक्तींना लक्ष्य करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

‘प्रिया ठाकूर’ बनून अधिकाऱ्यांना ओढले जाळ्यात

रश्मनी रवींद्रपाल हिच्यावर ‘प्रिया ठाकूर’ या खोट्या नावाने ऑनलाईन ओळख तयार करून भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांशी मैत्री वाढवत त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी हँडलर अब्दुल सत्तार आणि खालिद यांनी तिला आर्थिक लाभाचे आमिष दाखवून हे काम सोपवले होते. तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांची यादी देण्यात येत असे. त्या क्रमांकांवर संपर्क साधून युद्धाभ्यास, विशेष युनिट्सच्या हालचाली, तैनाती यासंबंधी माहिती मिळवण्याचे निर्देश तिला दिले जात होते. यासाठी रश्मणीने एअरटेल पेमेंट्स बँकेत खाते उघडून आर्थिक व्यवहार केल्याचेही तपासात समोर आले आहे.

Pakistan Spy Goa News
India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

महत्त्‍वपूर्ण पुरावे हाती

दोन्ही संशयितांच्या मोबाईलमधून आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप कॉल्स, आर्थिक व्यवहारांचे तपशील, दस्तऐवज आणि अन्य तांत्रिक पुरावे एटीएसने जप्त केले आहेत. या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू असल्याचे एटीएसने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले आहे.

Pakistan Spy Goa News
Pakistan: पाकिस्तानमध्ये 'संवैधानिक तख्तापलट'चा धोका! न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात; UNच्या धारधार टीकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ VIDEO

अजयकुमारशी ‘अंकिता शर्मा’ नावाने संपर्क

पाकिस्तानी हँडलरने ‘अंकिता शर्मा’ या खोट्या ओळखीने २०२२ मध्ये नागालँडमधील दिमापूर येथे पोस्टिंग असताना अजयकुमारशी संपर्क साधला होता. लष्करी युनिट्सची रचना, अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग, हालचाली आणि बदली यांची माहिती मागवण्यात आली. अजयकुमारने काही माहिती शेअरही केली. तसेच त्याला ट्रोजन मालवेअरची फाईल मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरून थेट माहिती पाठवण्याची गरज न राहता हँडलर्सना त्याच्या मोबाईलवर थेट प्रवेश मिळत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com