Guidelines for Tourist in Goa : सावधान! गोव्यात उघड्यावर जेवण, मद्यप्राशन पडणार महागात

50 हजारांपर्यंत दंड; ‘नितळ’ पर्यटनासाठी सरकारकडून नियमावली कडक
Tourist On Miramar Beach
Tourist On Miramar BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Guidelines for Tourist in Goa : राज्यात नव्या पर्यटन हंगामाचे वेध लागले असताना सरकारने पर्यटन व्यवसाय स्वच्छ करण्यासाठीची मोहीम सुरू केली आहे. यासाठी आज नवी नियमावली जाहीर करत उघड्यावर जेवण, मद्यपान, समुद्रकिनाऱ्यांवर वाहन नेणे, बोगस दलाल, अवैध फेरीवाल्यांसह भिकाऱ्यांवर 5 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. अर्थात, या कारवाईसाठी खात्याकडे फौजफाट्याची कमतरता आहे. त्यामुळे ही कारवाई कागदोपत्री ठरणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

काही पर्यटक सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. तसेच बंदी असुनही समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. शिवाय काहींनी थेट समुद्रात वाहने घातल्याचेही समोर आले आहे. या प्रकारांची गंभीर नोंद घेत असे केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे खात्याने जाहीर केले आहे. जलक्रीडा उपक्रमात अवैधरित्या दलाल वावरत असून हे थांबवण्यासाठी पर्यटन खात्याकडून प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पर्यटनाला फटका बसत असल्याने बाहेरील राज्यासाठी पर्यटनाचे पॅकेज देणाऱ्यांवर यापुढे बंदी घातली आहे.

Tourist On Miramar Beach
Goa Accident : सोमवार ठरला अपघातवार; तीन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटक पोलिसांविना

पर्यटन खात्याने कडक नियमावली जाहीर केली असली तरी दक्षिण गोव्यात या कारवाईसाठी एकही पर्यटन पोलिसांची नियुक्ती केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती पर्यटन पोलिस विभागाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिली आहे. तर उत्तर गोव्यात 61 पर्यटक पोलिस आहेत. राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी किमान आणखी 220 पर्यटन पोलिसांची आवश्‍यकता आहे. पर्यटक पोलिसांच्या कमतरतेमुळे किनारपट्टी सुरक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पोलिस करणार कारवाई

अवैध फेरीवाले आणि भिकारी यांच्यावरही आता पर्यटन खात्याचे लक्ष राहणार असून पर्यटक आणि गोमंतकीयांना त्रास देणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. यावर कारवाईचा अधिकार पोलिसांसह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे खात्याने नमूद केले आहे.

दलालदेखील रडारवर

पर्यटकांबरोबर संपर्क साधणाऱ्यांकडे व्यवसायाची अधिकृत नोंदणी आवश्‍यक आहे. क्रूझ सहलीसाठी येणारे पर्यटक, डेक बेड आणि शॅक्सवर जाणाऱ्या पर्यटकांची सतावणूक करणाऱ्या दलालांवरही कारवाई केली जाईल, असे नियमावलीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com