वास्को : गोव्यातील धार्मिक सलोखा हे देशातील एक आदर्श उदाहरण बनले आहे. तो आम्हाला संभाळून ठेवला पाहिजे. गोवेकरांनी जातधर्म न बघता नेहमी बंधुत्वपणा संभाळला आहे. त्यामुळे कोणी कोणतेही वक्तव्य केले, म्हणून गोवेकर त्या वक्तव्याला कधीच बळी पडणार नाही. गोव्यातील सर्वधर्मियांच्या बंधुत्व,ऐक्याच्याआड कोणी येऊ शकत नसल्याचे दाबोळीचे आमदार व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. (Gudinho inaugurated the development works at Wade )
पंचायत निवडणूक पक्षपातळीवर होणार नाही. जे इच्छुक आहेत त्यांनी निवडणूक लढवावी, त्यातून सुशिक्षित व सामाजिक कार्य करणारे निवडून येऊ दे, या निवडणुकीत विजयी व पराभूत होणारे आपलेच असतील विकासकामांसाठी त्या सर्वांचा पाठिंबा पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात नियोजित प्रलंबित वास्को कदंब बसस्थानक प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
वास्को मासळी मार्केट प्रकल्प मार्गी लावावा यासाठी आपले सहकार्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले वाडे येथील पै इस्पितळ ते हुतात्मा चौक, स्वातंत्र्य पथ दरम्यानच्या रस्त्याचे हॉटमिक्स करण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री गुदिन्हो व वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते झाला. हॉटमिक्ससाठी सात कोटी रुपये खर्च होणार आहेत. याप्रसंगी नगरसेवक दीपक नाईक, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक गिरिष बोरकर व इतर उपस्थित होते.
वास्को व दाबोळी मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी आपण व आमदार साळकर संयुक्तपणे काम करणार आहोत. वास्को हे औद्योगिक राजधानीचे शहर आहे. येथे रेल्वे, विमान, बंदर, गोवा शिपयार्ड वगैरे असल्याने या शहरामध्ये चांगली पायाभूत साधन सुविधा असल्या पाहिजेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
दाबोळीच्या मानाने वास्को विकासकामांच्या बाबतीत बराच मागे असल्याचा पुनरुच्चार आमदार यांनी केला. वास्कोच्या विकासासाठी आमच्यामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही पाऊले उचलली आहेत. गुदिन्हो यांच्यासारख्या अनुभवी व ज्येष्ठ मंत्रीच्या मार्गदर्शनामुळे विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करणार आहोत. कदंब बसस्थानकावरील रस्त्याची दुर्दशा झाली असून, तो दुरुस्त करून डांबरीकरण निविदाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.