Panaji News : भाजपचे पालकत्व रा. स्व. संघ स्वीकारत नाही : रत्नाकर लेले

Panaji News : भाजपचा अयोध्येत पराभव होणे, ही एक आश्‍चर्यकारक घटना आहे. कारण मी पूर्वी आंदोलनावेळी गेलो होतो, तेव्हाची आणि आताची अयोध्या यात मोठा फरक आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, भाजपने उजव्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्रित करणे योग्य होते; परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आणि नंतर त्यांच्या गटालाच भाजपने सोबत घेतले, हे अनेकांना ते आवडलेले नाही.

भाजपप्रती असलेली नाराजी मतदानातून प्रकट झाल्याचे दिसते. भाजप ही राजकीय संघटना असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिचे पालकत्व स्वीकारत नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रत्नाकर लेले यांनी केली आहे.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. लेले म्हणाले की, भाजपमध्ये अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत.

तसेच उजव्या विचारसरणीला मानणारेही आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात अनेकदा चर्चा होते, संवाद होतो; परंतु संघ राजकीय क्षेत्रात लक्ष देत नाही. संघ भाजपचे पालकत्व स्वीकारत नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

भाजपचा अयोध्येत पराभव आश्‍चर्यकारक

भाजपचा अयोध्येत पराभव होणे, ही एक आश्‍चर्यकारक घटना आहे. कारण मी पूर्वी आंदोलनावेळी गेलो होतो, तेव्हाची आणि आताची अयोध्या यात मोठा फरक आहे. तेथे मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. पण प्रत्यक्ष मतदानासाठी भाजपचा मतदार घराबाहेर पडला नाही का? की आणखी कोणते कारण झाले? असे प्रश्‍न उपस्थित होत असल्याचे लेले यांनी सांगितले.

Panaji
Goa Todays Update News: स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

सांस्कृतिक संघटनावर संघाचा भर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच राजकीय क्षेत्रात काम केले नाही. केवळ आणीबाणीवेळी लोकशाहीला धोका निर्माण झाल्याने संघ वावरला; परंतु सरकार आल्यावर कधीही संबंध ठेवले नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे आपले चरित्र उजळ करण्यासाठी टीका करत आहे, असे नाही.

जर संघाला काही करायचे असेल तर तो शाखा वाढवेल, सेवाकार्यात वाढ करेल, स्वयंसेवक वाढवेल, चारित्र्यसंपन्न स्वयंसेवक निर्माण करत राहील, मग संघाला १०० वर्षे पूर्ण होवोत किंवा २०० वर्षे होवोत, संघ प्रामुख्याने सामाजिक, सांस्कृतिक संघटनावर भर देतो, असे लेले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com